मधमाशांच्या हल्ल्यात पित्याचा मृत्यू, मुलगा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 20:42 IST2023-03-31T20:42:14+5:302023-03-31T20:42:14+5:30
मधमाशांच्या मोहोळाने बाप-बेट्यावर हल्ला केला. यात बापाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नगरदेवळा गावाजवळ घडली.

मधमाशांच्या हल्ल्यात पित्याचा मृत्यू, मुलगा जखमी
नगरदेवळा, जि. जळगाव :
मधमाशांच्या मोहोळाने बाप-बेट्यावर हल्ला केला. यात बापाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नगरदेवळा गावाजवळ घडली.
सय्यद सफदर सय्यद इस्माईल (५८, रा. नगरदेवळा ता. पाचोरा) असे मृत इसमाचे नाव आहे. सफदर व त्यांचा मुलगा सय्यद अबिद हे दोन्ही जण शेतात कामावरून परतत होते. त्याचवेळी वडाच्या झाडावर असलेल्या मधमाश्यांनी बाप-बेट्यावर हल्ला केला. मधमाशांनी संपूर्ण शरीरावर चावा घेतल्याने सफदर यांचा जागीच मृत्यू झाला तर अबिद यास पाचोरा येथे व तेथून जळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
नगरदेवळा सीम या गावातील नागरिक व तरूणांनी मदतीसाठी धावाधाव केली. मात्र तोपर्यंत सफदर यांचा मृत्यू झाला होता. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सफदर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने हा परिवार पोरका झाला आहे.