महिनाभरात मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 13:02 IST2019-12-09T13:01:49+5:302019-12-09T13:02:07+5:30
जळगाव : विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुढील महिन्यात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा जि़ प़ मागासवर्गीय ...

महिनाभरात मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण
जळगाव : विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुढील महिन्यात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा जि़ प़ मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आला आहे़ संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे़
जळगाव येथे रविवारी संघटनेचे अध्यक्ष आऱ एस़ अडकमोल व जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली़ २३ वर्ष सेवा होऊनही आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम तर ३३ वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना द्वितीय कालबध्द पदोन्नती मिळालेली नाही, वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत, तीन वर्ष जास्त सेवा झालेल्यांना अद्याप स्थायीत्वचे प्रमाणपत्र मिळालेले नाही, जि़ प़ आरोग्य विभागात मागासवर्गीय कक्ष स्थापन झालेला नाही, महिला कर्मचाºयांना सुरक्षा मिळाली, कर्मचाºयांना अधिकाºयांकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, बदल्या झालेल्या कर्मचाºयांना कार्यमूक्त करण्यात यावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली़ सुनील निकम यांनी आभार मानले़ यावेळी अतुल सोनवणे यांची राज्य सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली़
आरोग्य सेविकांच्या संरक्षणासाठी के़ ये़ शेख यांची निवड झाली़ यासह चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, रावेर व यावल तालुका कार्यकारिणी अध्यक्ष व सचिवांची निवड यावेळी करण्यात आली़ यावेळी जिल्हा सरचिटणीस मिलिंद लोणारी, राज्य उपाध्यक्ष सुनील शिंदे, ार्याध्यक्ष मोहन टेमकर, कोषाध्यक्ष विजया पाटील, ज्योती घुले, राहुल तायडे, अभय नाले, प्रकाश कोळी, जगन्नाथ नन्नवरे, भगवान सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते़