कोरोनाचा हाहाकार असताना शेतकरी मात्र शेती कामात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:38 IST2020-03-30T16:37:07+5:302020-03-30T16:38:33+5:30
कोरोनाचा हाहाकार असताना शेतकरी मात्र शेती कामात व्यस्त आहे.

कोरोनाचा हाहाकार असताना शेतकरी मात्र शेती कामात व्यस्त
ठळक मुद्देरब्बी हंगाम झालाय तयारशेतातील पिके आणण्यासाठी धावपळ
महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : जगभर कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. देशभर लॉकडाऊन असताना ग्रामीण भागात शेतकरी मात्र कामात व्यस्त आहे. अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. शेतातील आहेत ती पिके घरात आणण्यासाठी धावपळ सुरू आहे.
रब्बी हंगाम गहू, हरबरा, मका तयार झाला आहे. त्यात कोरोनाचे महासंकट आ’वासून उभे आहे. देशात लॉकडाऊन असताना जनतेला घरात थांबण्याचे आवाहन होत असताना शेतकरी मात्र शेतात राबताना दिसत आहे.