नेरी येथे विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 17:12 IST2019-08-17T17:10:49+5:302019-08-17T17:12:16+5:30
विजेचा शॉक लागून शेतकरी रामचंद्र शहादू चौधरी (सोनार) (वय ६२) या शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी येथे घडली.

नेरी येथे विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
नेरी, ता.जामनेर, जि.जळगाव : विजेचा शॉक लागून शेतकरी रामचंद्र शहादू चौधरी (सोनार) (वय ६२) या शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी येथे घडली.
रामचंद्र चौधरी (सोनार) हे शेतात काम करीत होते. तेव्हा त्यांच्या शेतातील जमिनीतून गेलेल्या केबलचा त्यांना जोरदार धक्का बसला व त्यात ते जागीच कोसळले. त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्याचे सांगितल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात नेत होते. वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे येथील संजय सोनार यांचे ते वडील होत.