आॅनलाईन लोकमतडोंगरकठोरा,ता.यावल : डोंगरकठोरा शिवारात अस्वलाने हल्ला केल्याने ज्ञानेश्वर सुका बाऊस्कर (४५) हा शेतकरी जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली.बाऊस्कर हे गावाजवळील शेतात सकाळी पत्नी व मजुरांसोबत काम करीत होते. ठिबकचा व्हॉल्व बदलण्यासाठी केळी बागेत जात असताना अस्वलाने अचानक मागून हल्ला केला. त्यांच्या मांडीवर मोठी जखम झाली. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे शेतातील शेखर पाटील, गुणवंत झांबरे व त्यांची पत्नी व मजुरांनी धाव घेतली. त्यामुळे अस्वल तेथून पळून गेले. या घटनेमुळे शेतात काम करणाºया लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बाऊस्कर याच्यावर तत्काळ फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून उपाययोजना करावी, अशी मागणी उपसरपंच नितीन भिरुड व ग्रामस्थांनी केली.
डोंगरकठोरा येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:53 IST
यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शिवारातील घटना
डोंगरकठोरा येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
ठळक मुद्देकेळी बागेत जात असताना अस्वलाने केला हल्लाआरडाओरड केल्याने पळाले अस्वलवनविभागाने अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी