शेतकऱ्याच्या मालाला पुरेसा भाव मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:39 IST2020-01-04T19:36:13+5:302020-01-04T19:39:23+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयाच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे.

The farmer's goods did not get enough prices | शेतकऱ्याच्या मालाला पुरेसा भाव मिळेना

शेतकऱ्याच्या मालाला पुरेसा भाव मिळेना

ठळक मुद्देशेतकरी बांधवांची व्यथाकृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेण्यास नकार

प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयाच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे.
सूत्रांनुसार, खडके खुर्दचे शेतकरी विलास गुलाब पाटील हे सफेद ज्वारी घेऊन बाजार समितीत गेले. त्यांच्या मालाचा लिलाव करण्यासाठी कोणीही व्यापारी यायला तयार होत नव्हते. संबधित शेतकºयाने विनंती करूनदेखील ते माल घेण्यासाठी तयार होत नव्हते. तेव्हा शेतकºयाने बाजार समितीच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांनी कासोदा येथील व्यवस्थापकाला फोन केला. तेव्हा व्यापारी जयप्रकाश समदाणी आले. परंतु त्यांनी माझ्याकडे माणसं नाहीत व माल ठेवायला जागा नाही, अशी उत्तरे देऊन माल घेण्यास नकार दिला. त्यानंतर दिलीप मंत्री यांनी सफेद ज्वारी घेण्यास नकार देऊन ज्वारी काळी असती तर घेतली असते, असे सांगून शेतकºयाच्या मालाची खिल्ली उडवली. काळ्या ज्वारीला मार्केट आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले. म्हणजे पावसाचा फटका बसलेली काळी ज्वारी त्यांना कमी भावाने मिळते व नफा जास्त मिळतो म्हणून काळी ज्वारीला पसंती दिली जाते व चांगला शेतकऱ्यांचा माल नाकारला जातो, असे सर्वच मालाच्या बाबतीत घडत असते. अशा अनेक वेळा तक्रारी करूनदेखील कासोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव, संचालक यांनाही व्यापारी दाद देत नाही. याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी शेतकरी बांधवांची व्यथा आहे.

आम्ही १४०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दराने ज्वारी खरेदी करतो. एका व्यापाºयाने १६०० रुपये भाव देऊ केला होता. मालाला उठाव नाही. त्यामुळे जास्त भाव देऊ शकत नाही.
-शैलेश मंत्री, व्यापारी, कासोदा, ता.एरंडोल

कासोदा बाजार समितीत शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. तेथील कर्मचाºयांना हटवून याबाबत शिस्त लावणे, लिलाव प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी, यासाठी त्वरित लक्ष देऊ.
-सुनील पवार, अध्यक्ष बाजार समिती, धरणगाव.

Web Title: The farmer's goods did not get enough prices