‘मधुकर’च्या वार्षिक सभेत थकीत पेमेंटसाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:33 PM2019-09-15T18:33:57+5:302019-09-15T18:36:21+5:30

मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत संचालक मंडळाला ऊस उत्पादकांच्या १५ कोटींच्या थकीत पेमेंटसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले.

Farmers are aggressive in getting paid for 'Madhukar' annual meeting | ‘मधुकर’च्या वार्षिक सभेत थकीत पेमेंटसाठी शेतकरी आक्रमक

‘मधुकर’च्या वार्षिक सभेत थकीत पेमेंटसाठी शेतकरी आक्रमक

Next
ठळक मुद्देसंचालकांना जावे लागले रोषाला सामोरेगोंधळातच सर्व विषय मंजूर

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत संचालक मंडळाला ऊस उत्पादकांच्या १५ कोटींच्या थकीत पेमेंटसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. रविवारी आयोजित सभा गोंधळात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते.
‘मधुकर’च्या कार्यस्थळावर ही वार्षिक सभा झाली. सभा सुरू होण्यापूर्वी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करत असताना शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली व उसाचे पेमेंट कधी देणार याचा जाब संचालक मंडळाला विचारण्यास सुरुवात केली. यावेळी चेअरमन शरद महाजन यांनी ऊस उत्पादकांना समजावत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र ऊस उत्पादक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी संतप्त शेतकºयांनी थेट व्यासपीठापर्यंत धाव घेतली. यावेळी चेअरमन शरद महाजन यांनी जोपर्यंत शासनाकडून थकहमी मिळत नाही तोपर्यंत थकीत पेमेंट करणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यासाठी सर्व स्तरावरून पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगितले.
भागवत पाटील यांनीही शेतकºयांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. शेतकरी शांत होत नसल्याचे लक्षात येताच चेअरमन महाजन यांनी सभा तहकूब करण्याचे जाहीर केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन राकेश फेगडे तसेच विजय पाटील यांनी शेतकºयांना शांत करीत सभा होणे गरजेचे आहे. त्याशिवाय शासनाकडे ठराव जाऊ शकत नाही. आपली मागणी रास्त आहे पण त्यासाठी सभा होऊ द्या, असे आवाहन केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार हरिभाऊ जावळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना कारखाना बंद व्हायला नको. जी परिस्थिती जिल्ह्यातील अन्य कारखान्यांची आहे ती ‘मधुकर’ची होता कामा नये, असे सांगत कारखान्याचा संचित तोटा वाढल्याने जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी येत आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे. सर्वांचे पेमेंट अदा करण्यासाठी एक तर थकहमी मिळवणे अथवा संचालक मंडळाची मालमत्ता तारण ठेवणे हे पर्याय आहे मात्र त्यासाठी उच्च न्यायालयाचेही काही निर्देश आहे. आगामी काळात त्यावर निश्चित योग्य तो तोडगा निघेल व सर्वांचे पेमेंट दिले जाईल, असे सांगत सर्वांना आश्वस्त केले.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मधुकर कारखान्यावर या विभागाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, ज्या वेदना शेतकºयांच्या आहे त्याच आमच्यासुद्धा आहेत, थकहमीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला लवकरच यश येईल.
शासनाकडून आरआरसीची कारवाई झाली आहे व या कारवाईविरोधात जिल्हा बँक न्यायालयात गेली आहे या सर्व विषयावर एकत्र बसून मार्ग काढला जाईल. तोवर संयम ठेवण्याचे आवाहन केले.
व्यासपीठावर माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, यांच्यासह जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, शेतकी संघाचे अध्यक्ष तथा संचालक नरेंद्र नारखेडे, कामगार युनियनचे अध्यक्ष किरण चौधरी, कार्यकारी संचालक एस.आर.पिसाळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सर्व संचालक व हंगामात जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी उपस्थित होते. आभार व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी मानले

Web Title: Farmers are aggressive in getting paid for 'Madhukar' annual meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.