मोयगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:23 IST2018-10-23T23:20:29+5:302018-10-23T23:23:35+5:30
मोयगांव बुद्रुक येथील शेतकरी विजय संतोष नेमाडे (वय ४०) यांनी सोमवारी सकाळी शेतात विष प्राशन केल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी जळगावला सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असतांना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

मोयगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या
ठळक मुद्देविजय नेमाडे यांच्याकडे विविध कार्यकारी सोसायटीचे होते कर्जउपचार सुरु असताना मंगळवारी झाला मृत्यू
जामनेर : तालुक्यातील मोयगांव बुद्रुक येथील शेतकरी विजय संतोष नेमाडे (वय ४०) यांनी सोमवारी सकाळी शेतात विष प्राशन केल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी जळगावला सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असतांना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. नेमाडे यांचा मृत्यू दुष्काळी स्थितीचा बळी ठरल्याचे बोलले जात आहे.
नेमाडे यांचेकडे अडीच एकर शेती होती. विकास सोसायटीतून घेतलेल्या कर्जातून त्यांनी पेरणी केली होती. अनियमित पावसामुळे पीक हातचे जात असल्याचे पाहुन ते व्यथीत होते.