जांभोरा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:59 IST2019-01-19T23:59:37+5:302019-01-19T23:59:58+5:30
विषारी द्र्रव्य प्राशन

जांभोरा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
धरणगाव : तालुक्यातील जांभोरे येथील युवा शेतकरी भूषण देवा पाटील (वय-४०) यांनीे आपल्या शेतात विषारी द्र्रव्य प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मयत भूषणचे वडिल देवा गजमल पाटील हे अल्पभूधारक शेतकरी असून यावर्षी कापूस पिकाचे अल्प उत्पादन आल्याने त्यांच्यावर विका सोसायटी व इतर खाजगी कर्ज ते फेडू न शकल्याने संपूर्ण परिवार चिंताग्रस्त होता असे, धीरेंद्र पुरभे यांनी सांगितले. या विवंचनेत भूषणने शनिवारी संध्याकाळी शेतात जाऊन विषारी औषध घेतल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भूषण हा एकुलता एक मुलगा होता. मुलाचा मृतदेह पाहून आई वडिलांनी आक्रोश केला.