पारोळा तालुक्यातील वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 20:18 IST2019-12-20T20:17:33+5:302019-12-20T20:18:34+5:30
वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने दिलीप प्रताप पवार (३४) या शेतकºयाचा मृत्यू झाला.

पारोळा तालुक्यातील वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील वसंतवाडी येथे रोटाव्हेटरमध्ये पाय अडकल्याने दिलीप प्रताप पवार (३४) या शेतकºयाचा मृत्यू झाला. दि. १९ रोजी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली.
शेतात काम करीत होते. तेव्हा रोटामध्ये कचरा अडकल्याने तो काढण्यासाठी दिलीप पवार हे खाली उतरले. त्यात त्यांचा पाय अडकल्याने ते गंभीर जखमी झाले. तेव्हा त्यांना गावातील प्रभू पवार, संतोष पवार, वसंत पवार, विजय पवार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. २० रोजी पहाटे २ वाजता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याबाबतची माहिती महादू हारदे पवार यांनी पोलिसांना दिली. तवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार जयवंत पाटील करत आहे.