Farm worker dies of snake bite at Takerheda | टाकरखेडा येथे सर्पदंशाने शेतमजुराचा मृत्यू

टाकरखेडा येथे सर्पदंशाने शेतमजुराचा मृत्यू

ठळक मुद्देशेतात काम करताना घडली घटनाउपचारापूर्वीच झाला मृत्यू

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील टाकरखेडा येथील कपाशी पिकावर फवारणी करीत असलेल्या प्रवीण प्रकाश पाटील (वय ३०, रा.टाकरखेडा) शेतमजुराच्या पायास विषारी सर्पाने दंंश केल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी अकराला ही घटना घडली.
टाकरखेडा येथील शेतमजूर गावातील संजय महाजन यांच्या शेतातील कपाशी पिकावर फवारणी करीत असताना त्यांच्या पायास विषारी सापाने चावा घेतला.
सर्पदंश झाल्यानंतर प्रवीण पाटील यांनी तातडीने गावात पायी येत शेतमालक संजय महाजन यांना सांगितले असता महाजन यांनी तातडीने त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. शेतमालक महाजन यांच्या खबरीवरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहा. फौजदार अजित शेख करीत आहेत. शवविच्छेदनानंतर नातेवाईकाच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई आहे.

Web Title: Farm worker dies of snake bite at Takerheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.