गोंडगाव विद्यालयात निरोप व सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST2021-07-07T04:19:42+5:302021-07-07T04:19:42+5:30

गोंडगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. के. सानप यांची (सार्वे, ता. पाचोरा) येथे माध्यमिक विद्यालयात बदली झाली आहे. गोंडगाव विद्यालयात ओ. ...

Farewell and felicitation ceremony at Gondgaon Vidyalaya | गोंडगाव विद्यालयात निरोप व सत्कार समारंभ

गोंडगाव विद्यालयात निरोप व सत्कार समारंभ

गोंडगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. के. सानप यांची (सार्वे, ता. पाचोरा) येथे माध्यमिक विद्यालयात बदली झाली आहे. गोंडगाव विद्यालयात ओ. पी. जाधव यांची नूतन मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली आहे. तसेच विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक पी. व्ही. चव्हाण यांची वाघळी (ता. चाळीसगाव) येथील माध्यमिक विद्यालयात बदली झाली आहे. बी. एल. सावंत यांची सार्वे (ता. पाचोरा) माध्यमिक विद्यालयात बदली झाले असून राहुल महाले विद्यालयात रुजू झाले आहेत. या निमित्त विद्यालयामार्फत निरोप व सत्कार समारंभाचे छोटेखानी आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्याध्यापक ओ.पी. जाधव, मुख्याध्याक जी. के. सानप, शिक्षक पी.व्ही. चव्हाण, बी. एल. सावंत, राहुल महाले यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार विद्यालयाचे शिक्षक भूषण साळुंखे यांनी केले. यावेळी सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, पी. व्ही. जाधव, व्ही. ए. पाटील, एस. वाय. पाटील, एस. आर. पाटील, जी. जे. भोसले, पी. व्ही. सोळंके, बी. डी. बोरसे, आर. एस. सैंदाणे, एल. एस. पाटील, बी. आर. साळुंखे, एस. आर. महाजन, बी. एस. वाडेकर, बी. एल. सावंत, लिपिक टी. ए. घुले, राहुल महाले, चंद्रशेखर पवार, भीमसिंग महाले, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, व्ही. एम. जाधव उपस्थित होते.

Web Title: Farewell and felicitation ceremony at Gondgaon Vidyalaya