शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

मातब्बरांनाही स्पर्धकाविषयी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:48 IST

एकनाथराव खडसे, जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत, गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द उमेदवार कोण?, बंडखोरी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी जागावाटप, अधिकृत उमेदवार यादीविषयी दिल्ली-मुंबईत घोळ

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्टÑवादी यांच्यातील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. जागावाटप नसल्याने अधिकृत उमेदवारांची यादीही लटकलेली आहे. शेवटच्या दिवशी ४ रोजी अधिकृत उमेदवाराच्या हाती थेट एबी फॉर्म दिला जाईल, असे वाटते. बंडखोरी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून ही खबरदारी बाळगली जात असली तरी मातब्बर नेत्यांविरोधात उमेदवार कोण हेदेखील अद्याप निश्चित झालेले नाही. लढतीची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार असे दिसते.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी युती आणि आघाडीचे जागावाटप सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करायला चार दिवस उरलेले असताना अधिकृत उमेदवार यादीची प्रतीक्षा आहे.राजकीय वर्तुळातील चर्चा आणि त्याचे उमटलेले पडसाद लक्षात घेता काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी निश्चित झालेली आहे. खान्देशातील २० जागांपैकी काँग्रेस ९ तर राष्टÑवादी ११ जागा लढवेल, असे सूत्र आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव शहर या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर धुळ्यात विद्यमान आमदार असलेल्या धुळे ग्रामीण, शिरपूर व साक्री या जागा तर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व चार म्हणजे नंदुरबार, नवापूर, शहादा व अक्कलकुवा या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील ९, धुळ्यातील धुळे शहर व शिंदखेडा अशा ११ जागा राष्टÑवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.जागावाटप अधिकृत जाहीर झाले नसले तरी त्याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याने काँग्रेस व राष्टÑवादीमध्ये पडसाद उमटले. जळगावातील काँग्रेस भवनात नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रोष व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. राष्टÑवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी पदाचा राजीनामा दिला. केवळ जागावाटपाचे सूत्र अनधिकृतपणे जाहीर होताच, ही प्रतिक्रिया उमटली. सत्ताधारी भाजप-सेना युतीचे जागावाटप आणि उमेदवार यादी जाहीर झाल्यावर किती मोठी प्रतिक्रिया उमटेल, याची कल्पना केलेली बरी.याची पुरेपूर कल्पना पक्षश्रेष्ठींना असल्याने सावधपणे व गोपनीयता बाळगून युती-आघाडीची बोलणी सुरु आहे. अगदी राज्याचे लक्ष लागून असलेल्या मातब्बरांच्या मतदारसंघातही अद्याप लढती निश्चित झालेल्या नाहीत, यावरुन परिस्थिती किती नाजूक आहे, हे स्पष्ट होते.एकनाथराव खडसे यांच्याविरोधात कोण उभे राहणार हे अद्याप निश्चित नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे अपक्ष उभे राहतील काय? राष्टÑवादी कुणाला संधी देते? पाटील यांना पाठिंबा देते काय? जयकुमार रावळ यांच्या विरोधात संदीप बेडसे की, श्यामकांत सनेर? गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द विशाल देवकर, ज्ञानेश्वर महाजन, लकी टेलर की आणखी कोणी? डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात कोण राहील? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.पुढच्या सोमवारी, ७ आॅक्टोबरला माघार आहे, तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होईल. तोवर प्रत्येक पैलवान शड्डू ठोकून मैदानात जोर बैठका मारताना दिसेल.एकनाथराव खडसे यांच्याविरुध्द चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील हेच पारंपरिक प्रतिस्पर्धी राहतील का? जयकुमार रावल यांना पुन्हा संदीप बेडसे, श्यामकांत सनेर यांच्याशी मुकाबला करावा लागेल का? सलगपणे विजय मिळविणाऱ्या डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासमोर प्रबळ उमेदवार देण्याचा शोध अद्याप संपलेला नाही. कुणाल वसावे, डॉ.राजेश वळवी यांच्यासोबत अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव