नातवाच्या मृत्यूच्या रागातून कुटुंबीयांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST2021-05-17T04:14:04+5:302021-05-17T04:14:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भिलपुरा मशिदीच्या मागे राहात असलेल्या कुटुंबियांना पाळधी येथील नातेवाईकांनीच शिवीगाळ करत महिलेसह दोघा मुलांना ...

Family members beaten out of anger over grandson's death | नातवाच्या मृत्यूच्या रागातून कुटुंबीयांना मारहाण

नातवाच्या मृत्यूच्या रागातून कुटुंबीयांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भिलपुरा मशिदीच्या मागे राहात असलेल्या कुटुंबियांना पाळधी येथील नातेवाईकांनीच शिवीगाळ करत महिलेसह दोघा मुलांना मारहाण केल्याची घटना १४ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेख सलीम शेख अहमद वय (४८) हे शनिपेठेत भिलपुरा मशिदीच्या मागे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी शेख यांचा २ महिन्यांच्या नातवाच्या नाका तोंडातून उलटी झाली. यात श्‍वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा राग मनात ठेवून शेख सलीम यांचे नातेवाईक शेख अक्तर शेख अहमद, शेख अकबर शेख नबी, रुकय्याबी शेख अबकर, शेख अक्रम शेख अकबर (सर्व रा. पाळधी, ता. धरणगाव) हे १४ मे रोजी भिलपुरा येथे शेख सलीम यांच्याकडे आले व शेख सलीम यांची पत्नी सुलतानाबी, मुलगी नूर बानो, मुलगा अल्तमश यांना शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. शेख अक्रम याने केलेल्या मारहाणीत अल्तमश हा जखमी झाला आहे. या मारहाणीदरम्यान शेख सलीम यांच्या पत्नीचेही मंगळसूत्रही तोडून नुकसान झाले. याप्रकरणी रविवारी शेख सलीम शेख अहमद यांच्या फिर्यादीवरुन शेख अक्तर शेख अहमद, शेख अकबर शेख नबी, रुकय्याबी शेख अबकर, शेख अक्रम शेख अकबर (सर्व रा. पाळधी, ता. धरणगाव) यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज इंद्रेकर हे तपास करीत आहेत.

Web Title: Family members beaten out of anger over grandson's death