जळगाव : सिंधी कॉलनीतील कंवर नगर पोलीस चौकीच्या मागे असलेल्या संजय गांधी नगरात कंजरवाड्यातील एका गटाने अशोक जोशी यांच्या कुटुंबावर हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजता घडली. निलेश अशोक जोशी (वय २२) या तरुणाच्या डोक्यात दारुच्या बाटल्या घातल्या तर त्याची बहिण दिव्या हिलाही बेदम मारहाण केली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत जखमी व त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दिलेल्या माहितीनुसार, गणेश राजधर मोटे व पत्नी नेहा या दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरु असताना गणेश याच्या पायातील चप्पल बाटुंगे परिवारातील सदस्यांच्या अंगावर गेली. मुद्दामहून चप्पल मारल्याचा गैरसमज झाल्याने सुमीत रवी बाटुंगे, गोटू राजू बाटुंगे, रेना बाटुंगे, नुरी बाटुंगे व इतरांनी अचानकपणे गल्लीत विटा, दगड व दारुच्या बाटल्यांचा मारा सुरु केला. त्यात गणेश व नेहा या पती-पत्नीला मारहाण केली तर शेजारीच असलेल्या निलेश अशोक जोशी या तरुणाच्या डोक्यात दारुच्या बाटल्या टाकल्या. मुलगा रक्तबंबाळ झाल्याने त्याच्या मदतीसाठी आलेले वडील अशोक जोशी, आई जिजाबाई व बहिण दिव्या यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. निलेश याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यात २१ टाके घालण्यात आले आहेत.दुचाकीची तोडफोडया टोळक्याने गल्लीत दगडफेक करुन दहशत माजविण्याबरोबरच गणेश मोटे याच्या दुचाकीची तोडफोड केली. या घटनेत नेहा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले.
जळगावातील संजय गांधी नगरात कुटुंबावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:01 IST
दोन जखमी
जळगावातील संजय गांधी नगरात कुटुंबावर हल्ला
ठळक मुद्देगल्लीत दगडफेकडोक्यात घातल्या दारुच्या बाटल्या व विटा