फैजपुरात पुन्हा आठ जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 21:08 IST2020-06-13T21:07:00+5:302020-06-13T21:08:05+5:30

शहरातील कोरोनाचा प्रभाव वाढत असून शनिवारी प्राप्त अहवालांमध्ये आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

In Faizpur, eight people were again hit by a corona | फैजपुरात पुन्हा आठ जणांना कोरोनाची बाधा

फैजपुरात पुन्हा आठ जणांना कोरोनाची बाधा

ठळक मुद्देरुग्णसंख्या पोहोचली १९पर्यंतएका पोलिसाचा समावेश

फैजपूर, ता.यावल : शहरातील कोरोनाचा प्रभाव वाढत असून शनिवारी प्राप्त अहवालांमध्ये आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात एका कोरोना योद्धा पोलिसांचा समावेश आहे
शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता १९ झाली असून, त्यापैकी चार जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेले आहे, तर १५ बाधितांवर आता उपचार सुरू आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये खुशाल भाऊ रोडवरील पुन्हा दोघांचा समावेश आहे तर रथगल्लीमधील आधीच बाधित असलेल्या ५६ वर्षीय महिलेच्या परिवारातील दोघांना बाधा झाली आहे. त्यात एका आठ वर्षीय मुलीचा समावेश आहे, तर इस्लामपुरामधील मयताच्या मुलालाही बाधा झाली आहे. देवी वाड्यातील दोघांचा व एका कोरोनायोद्धा पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरातील कंटेनमेंट क्षेत्रांची संख्या आता नऊ झाली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.

Web Title: In Faizpur, eight people were again hit by a corona