फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 16:23 IST2019-07-28T16:21:40+5:302019-07-28T16:23:41+5:30

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा पार पडला.

Faizpur Dhanaji Nana College Alumni Affiliation Meet | फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

ठळक मुद्देमान्यवरांनी केले मार्गदर्शनमहाविद्यालयातून घडले अनेक मान्यवर

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा पार पडला. विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
व्यासपीठावर तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, मिलिंद वाघुळदे, प्राचार्य तुकाराम बोरोले, गणेश गुरव, प्रा.डॉ.जतीन मेढे, प्राचार्य नि.रा.फेगडे, चंद्रशेखर चौधरी, उपप्राचार्य प्रा.डी बी तायडे, उपप्राचार्य डॉ.उदय जगताप उपस्थित होते.
प्राचार्य तुकाराम बोरोले यांनी शिक्षणाशिवाय उत्कर्ष होणार नाही याची जाणीव ठेवून या महाविद्यालयाची निर्मिती झाली आहे. श्रमसंस्कार या महाविद्यालयाने जपले आहे. या महाविद्यालयातून ज्यांनी शिक्षण घेतले त्यांनी स्वत:च्या विकासासोबत समाजाचाही विकास केला आहे या संस्थेने अनेक पिढ्या घडविल्या आहेत. म्हणून या संस्थेचा इतिहास जपून ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.
उपप्राचार्य डॉ.उदय जगताप यांनी नॅकसंदर्भातील आवश्यक माहिती दिली. गणेश गुरव यांनी या महाविद्यालयाने उच्च शिक्षणासोबत लोकशाही मूल्ये दिली. राष्ट्र निर्मितीमध्ये या महाविद्यालयाचे मोठे योगदान आहे.
डॉ.कल्पना पाटील व मोजेस जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी यावल व रावेर तालुक्यातील आर्थिक, शैक्षणिक विकास या महाविद्यालयाने कसा केला याची माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी लोकसहभागातून धनाजी नाना महाविद्यालायची निर्मिती झाली आहे. या महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थांनी शिक्षण, समाज, अर्थ, विज्ञान, राजकारण कृषी क्षेत्रात आपलं नाव मोठं केलं आहे. महाविद्यालयात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण दलित आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. बदलत्या काळानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. पुढील काळात प्लेसमेंट सेल निर्माण करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन केले.
यावेळी बहुसंख्येने माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डी.बी.तायडे, सूत्रसंचालन प्रा.कुमुदिनी धांडे, प्रा.राजेंद्र राजपूत यांनी, तर आभार प्रा.डॉ कल्पना पाटील यांनी मानले.

Web Title: Faizpur Dhanaji Nana College Alumni Affiliation Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.