कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, काँग्रेसचे भुसावळात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:22 IST2020-09-16T16:21:39+5:302020-09-16T16:22:14+5:30
कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी शहर कॉग्रेस कमेटी व सर्व फ्रंटलतर्फे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, काँग्रेसचे भुसावळात आंदोलन
भुसावळ : कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी शहर कॉग्रेस कमेटी व सर्व फ्रंटलतर्फे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भुसावळ शहर कॉग्रेस अध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोहमद मुनव्वरखान, शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सलीम गवळी, प्रदेश अनुसूचित विभागाचे समन्वय भगवान मेंढे, युवक कॉग्रेसचे अध्यक्ष इम्रानखान, विलास खरात, राजेंद्र सीरीनामे, शैलेश अहिरे, संतोष साळवे, रानी खरात, हमीदा गवली, जानी गवली, सुखदेव सोनवणे, महेंद्र महाले, किशोर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.