हरताळा येथे बाईक जळून खाक
हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथील नवीन प्लॉट भागातील साई मंदिर रस्त्यावरील सदानंद सदाशिव कुंभारकर यांची घरासमोर चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळून खाक झाली.
या घटनेबाबत प्राथमिक स्वरूपात शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या या मोटार बाईकचा पूर्ण कोळसा झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शुक्रवार रोजी संध्याकाळची वेळ असल्याने सर्वच घरी होते. आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ इलेक्ट्रिक सप्लाय बंद करून आग विझविण्यासाठी आजूबाजूची मित्रमंडळी धावून आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेजारील सुनील शेळके,गणेश चौरे, रईस मेकॅनिक, प्रशांत वडस्कर, बिस्मिल्ला कासम, महेश भोईटे आदींनी आग विझविणेकामी मदत केली.
येथील सदानंद सदाशिव कुंभारकर यांनी गेल्या सात महिन्यापूर्वीच इलेक्ट्रिकवर चार्जिंग होणारी मोटारसायकल ८८ हजारात विकत घेतली होती. मात्र चार्जिंगवर मोटार बाईक लावली असता संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानक मोटारसायकलने पेट घेतला. त्याचप्रमाणे संपूर्ण मोटारसायकल तिथेच जाळून खाक झाली. या घटनेत मोटारसायकल ही काही मिनिटातच जळून खाक झाली.
मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी असलेल्या खुर्च्या, प्लास्टिक, दोन ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे आदी सामानही जळून खाक झाले. मोठ्या श्रमाने किरकोळ भांड्यांचे दुकान टाकले होते. त्यात व्यवसाय वाढविण्यासाठी ही मोटरसायकल घेतली होती. त्यात मोठ्या प्रकारची हानी झाल्याने सदर व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
हरताळा तालुका मुक्ताईनगर येथील इलेक्ट्रिक मोटारसायकल जळताना.
(छाया : चंद्रमणी इंगळे)