शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपंग प्रमाणपत्रांचा गोरखधंदा उघड

By admin | Updated: October 9, 2014 15:00 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग प्रमाणपत्रांच्या गोरखधंद्याचा भंडाफोड झाला आहे.

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग प्रमाणपत्रांच्या गोरखधंद्याचा भंडाफोड झाला आहे. चार व्यक्तींना कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्रे देण्यात येत असल्याबाबतचा प्रकार कार्डियॉलॉजिस्टच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून याप्रकरणी मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे सुरू आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय अपंग प्रमाणपत्रांचा गोरखधंदा सुरू होता. त्यामुळे दलालही सक्रिय होते. चार व्यक्तींच्या नावाची कर्णबधिर असल्याबाबतची बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. मात्र या प्रमाणपत्रांवर माझ्या सह्या झालेल्या नाहीत. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील व्यक्तींचा समावेश असल्याबाबतची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मुंबईच्या अपंग तपासणी कार्यालयातील मुख्य सर्व्हरवरून ही प्रमाणपत्रे कोणत्या संगणकामध्ये तयार करण्यात आलेली आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात मुंबईच्या कार्यालयाला ई-मेल करण्यात आला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के.शेळके म्हणाले. कर्णबधिरांची प्रमाणपत्रे जप्त केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के. शेळके यांनी अपंगांची तपासणी करणारे डॉक्टर आणि त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांची तातडीची बैठक त्यांच्या कार्यालयात बोलाविली होती.
-------------
कान, नाक, घसा विभागातील कार्डियॉलॉजिस्ट सुनील पाटील यांनी ३२ अपंगांची प्रमाणपत्र ऑनलाइन वितरण प्रणालीव्दारे तपासणीसाठी पाठविलेले होते. मात्र मंगळवारी त्यांनी पाठविलेल्या नावांबाबत खात्री केली असता त्यांना ऑनलाइन प्रणालीमध्ये ३२ ऐवजी ३६ नावे आढळून आली. त्यांना शंका आली. त्यांनी संबंधित चार इसमांच्या देण्यात आलेल्या माहितीबाबत खात्री केली असता कोणताही पुरावा आढळून आला नाही. प्रमाणपत्रांवर नावे असलेल्या व्यक्तींच्या नावे केस पेपर आढळून आला नाही. तसेच त्यांची तपासणीही केल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे पाटील यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के.शेळके यांच्याकडे तक्रार केली. अपंग, कर्णबधिर आणि अंध प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयात संगणक प्रणालीव्दारे वितरीत करण्यात येतात. या संगणकांना पासवर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रमाणपत्र वितरीत करणारे डॉक्टर आणि त्यांच्यासोबत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा यामध्ये सहभाग असल्याबाबतची शंका व्यक्त करण्यात येत आहे.