जळगाव शहर मतदार संघ : १३ उमेदवारांचा १८ लाख २८ हजार ७४४ रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:23 PM2019-10-16T12:23:38+5:302019-10-16T12:24:34+5:30

सर्व उमेदवारांनी सादर केला खर्च

Expenditure of Rs. 1 lakh 5 thousand 5 for 2 candidates | जळगाव शहर मतदार संघ : १३ उमेदवारांचा १८ लाख २८ हजार ७४४ रुपये खर्च

जळगाव शहर मतदार संघ : १३ उमेदवारांचा १८ लाख २८ हजार ७४४ रुपये खर्च

googlenewsNext

जळगाव : विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या दुसरी हिशोब तपासणी १५ रोजी करण्यात आले. यामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण १३ उमेदवारांचा १८ लाख २८ हजार ७४४ रुपये खर्च झाला आहे. विशेष म्हणजे सर्व उमेदवारांनी खर्च सादर केल्याने पहिल्या दोनही तपासणीमध्ये कोणालाही नोटीस काढण्याची वेळ आली नाही.
जळगाव शहर मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या तसेच माघार घेतलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याविषयी जळगाव शहर मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी पत्र काढून ते उमेदवारांना ई-मेल तसेच मोबाईलवर पाठविले होते. त्यात निवडणूक खर्च हिशोब नोंदवही तपासणीसाठी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी मनपा इमारतीमध्ये असलेल्या हिशोब शाखेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ११ रोजी उमेदवारांच्या हिशोब वहीची पहिली तपासणी ११ रोजी झाली. त्यानंतर १५ रोजी दुसरी तपासणी करण्यात आली.
यात उमेदवारांनी सादर केलेल्या हिशोबानुसार भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांचा १० लाख ५३९ रुपये खर्च झाला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा ४ लाख ७७ हजार ३७१ रुपये, अपक्ष उमेदवार अनिल वाघ यांचा ६७ हजार ८५३ रुपये, वंचित बहुजन आघाडीचे शफी अ.नबी शेख ६३ हजार ५७५ रुपये, मनसेचे जमील देशपांडे यांचा ४७ हजार ७७७ रुपये, अपक्ष डॉ. आशीष जाधव यांचा ४० हजार ६१६ रुपये, शिवराम पाटील यांचा ३७ हजार ६४५ रुपये, अपक्ष गोकूळ चव्हाण यांचा २४ हजार ९५० रुपये, माया अहिरे यांचा २२ हजार १९१ रुपये, बहुजन समाज पक्षाचे अशोक शिंपी यांचा १६ हजार ९३८ रुपये, अपक्ष ललित शर्मा यांचा १३ हजार २६६ रुपये, महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वंदना पाटील यांचा १० हजार ७०३ रुपये, बहुजन मुक्ती पक्षाचे गौरव सुरवाडे ५ हजार ३२० रुपये असा एकूण १३ उमेदवारांचा १८ लाख २८ हजार ७४४ रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक खर्च हिशोब शाखेतून मिळाली.

Web Title: Expenditure of Rs. 1 lakh 5 thousand 5 for 2 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव