शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

हद्दपार आरोपीनेच केली समता नगरातील घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 5:27 PM

समतानगरातील वंजारी टेकडी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भागवत ओंकार अहिरे यांच्याकडे पावणे तीन लाखाची घरफोडी करणाºया चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शहरातून हद्दपार केलेल्या राहूल नवल काकडे (३०, रा.समता नगर, जळगाव) याने त्याच्या तीन साथीदारांना सोबत घेऊन ही घरफोडी केली आहे. या चौघांकडून एक लाख ३० हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे चौघांच्या मुसक्या आवळल्या   दीड लाखाचे दागिने हस्तगत

जळगाव : समतानगरातील वंजारी टेकडी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भागवत ओंकार अहिरे यांच्याकडे पावणे तीन लाखाची घरफोडी करणाºया चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शहरातून हद्दपार केलेल्या राहूल नवल काकडे (३०, रा.समता नगर, जळगाव) याने त्याच्या तीन साथीदारांना सोबत घेऊन ही घरफोडी केली आहे. या चौघांकडून एक लाख ३० हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिनाभराच्या मेहनतीनंतर या चौघांना निष्पन्न केले. अटक केलेल्यांमध्ये राहूल नवल काकडे, बबुल रवींद्र सपकाळे (२६), किरण किशोर गोटे (१९) व बापु भावलाल सोनवणे (२२) सर्व रा.समता नगर, जळगाव यांचा समावेश आहे. काकडे याच्याविरुध्द हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या महिन्यात २५ ते २६ मार्चच्या दरम्यान समतानगरातील वंजारी टेकडी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भागवत ओंकार अहिरे यांच्याकडे  बंद घर फोडून चोरट्यांनी २ लाख रुपये रोख व ७९ हजाराचे दागिने असा ऐवज लांबविला होता.अहिरे हे कुटुंबियांसह सैलानी येथे गेले होते. तेथून परतल्यावर चोरीचा प्रकार समोर आला. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सहायक निरीक्षक महेश जानकर, सहायक फौजदार मनोहर देशमुख, रामचंद्र बोरसे, दादाभाऊ पाटील, रवींद्र पाटील, विजय पाटील, श्रावण पगारे, विकास वाघ, नरेंद्र वारुळे, प्रकाश महाजन, गफूर तडवी, किरण चौधरी, हरीष परदेशी, रवींद्र गिरासे, चंद्रकांत पाटील, विनायक पाटील, दत्तात्रय बडगुजर, चालक रवींद्र चौधरी, प्रवीण हिवराळे व दीपक पाटील यांचे पथक तयार केले होते. या पथकाने तांत्रिक माहिती व खबºयांमार्फत चौघांना निष्पन्न केले. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पथकाचे कौतूक केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव