शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

उत्साह, प्रत्येक ठिकाणी वेगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 4:54 PM

खरंच कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर जाताना बायकांचा जो उत्साह असतो तो खरंच बघण्यासारखा आणि दखल घेण्यासारखाही असतो. अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या कामासाठी किंवा कार्यक्रमालासुद्धा बरोबर कोण येईल, काय घालायचे, कुठे भेटायचे, कसं जायचं यावर अर्धा तास फोनवर बोलण्यापासून ते तयारीला एक तास लागला तरी त्यांना चालते आणि अगदी एखाद्या लग्नाला जाताना तयारीचा जो उत्साह असतो तसाच तो जाणवतो. या उत्साहाविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत साहित्यप्रेमी कौस्तुभ परांजपे...

आजही असेच फोन वर बोलणे सुरू होते व जाण्याची तयारी आणि वेळ ठरवणे सुरू होते. या उत्साहाकडे मी कौतुकाने बघत होतो.अगं येणार आहेस ना? हं तेच म्हणत होते मी. कुठे आहे? अगं म्हणजे एकाच ठिकाणी आहे. बरं मग किती वाजता निघायचं. हो बरोबर आहे. लवकरच जाऊन येऊ. अगं मग उन्हाचं नकोसं वाटतं. रांगेतही उभं रहावं लागतं. त्यापेक्षा आपण लवकरच जाऊन येऊ. दोघेही बरोबरच येणार आहात नं. हो आम्हीपण.नाही गं अजून तयारी व्हायची आहे. बरं एक ना. काय म्हणतेय मी; ड्रेस घालणार आहेस का साडी नेसणार आहेस? कोणत्या रंगाची? बरं बरं मी मी अबोली रंगाची काढते आज. हो गं बऱ्याच दिवसांपासून नेसलेच नाहीये आणि दोघींची सारखी पण होणार नाही आणि हो त्यावर फोटो पण चांगला येतो.खरं तर रंग या विषयावर चित्रकारांपेक्षाही बायकांचीच चर्चा अधिक झाली असेल, असं वाटतं. बरं रंग कोणी तयार केले किंवा त्यांची नाव कोणी ठेवली यापेक्षाही रंगावर मनापासून आणि प्रेमाने बोलणाºया बायकांना अबोली हे नाव खरंच मनापासून आवडल असेल का? कारण नाव अबोली आणि त्यावर आपणच भरभरून बोलायचं म्हणजे? पण ठिक आहे, काय करणार, चालायचंच. पण अबोली हे नाव छानच आहे.कदाचित रंगालासुद्धा बोलता आले असते तर अबोली या रंगाने ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ हे काय असतं ते सांगितलं असतं. कारण नाव अबोली पण त्यावर चर्चा मात्र भरमसाठ आणि उत्साहाने... घरातून निघातानाही अगोदर तयारी झाल्याचा व निघत असल्याचा व तेथे भेटण्याचा फोन झालाच आणि मग मला सूचना, त्या टेबलवर घडाळ्याखाली नीट ठेवलेल्या आहेत. बरोबरच घ्या, तिथे परत फिराफीर करावी लागते. सगळं बरोबर आहे व बरोबर घेतलं आहे याची खात्री झाल्यावर आम्ही बाहेर पडलो व ठरलेल्या ठिकाणी काही मिनिटे एकमेकांची वाट पाहून भेटलो. सगळं फोनवर बोलणं झाल्यावरदेखील या बायकांचा तिथेही बोलण्याचा उत्साह चार पाच वर्षांनी भेटलेल्या सारखा तर आम्हा पुरुषांच मात्र हाय हॅलो झाल्यावर निघायचं का? यावर चर्चा. तिथे गेल्यावर दहावीच्या परीक्षेत पहिल्या पेपरच्यावेळी मुलांना शाळेत गेल्यावर वर्ग कुठे आहे ही पाहण्याची, सांगण्याची व दाखवण्याची जेवढी उत्सुकता असते तेवढीच इथेही जाणवली. त्यानंतर आमचं नांव, नंबर पाहून आम्ही व्यवस्थित आमचा हक्क बजावून बाहेर आल्यावर परत यांचा उत्साहाचा पुढील भाग सुरू. बरं बाहेर आल्यावरसुद्धा बोर्डाच्या परीक्षेत पेपर खूपच सोप्पा गेल्यावर जो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहºयावर असतो, तसाच यांच्याही चेहºयावर होता.एका झाडाखाली आपल्या कपड्यांचे रंग त्या मागच्या भागावर उठावदार दिसतील अशा पद्धतीने उभे राहिल्यावर आपली शाई लावलेली बोटं दिसतील पण आपला हसरा चेहरासुद्धा तेवढाच चांगला दिसेल या पद्धतीने चांगले दोन तीन फोटो काढून ते एकमेकांना दाखवून नंतर पुढे पाठवून ते फोटो व्यवस्थित पाठवले गेले आहेत याची खात्री झाल्यावरच आमच मतदानाचं कर्तव्य पार पाडल यावर शिक्कामोर्तब झाल्यावर आम्ही घराच्या दिशेने निघालो. आता घरी गेल्यावर परत फोनवर कोण कोण जाऊन आलं किंवा जाणार आहे याची विचारपूस होईलच, पण आताचा कार्यक्रम तरी सध्या पुरता संपला आहे हे नक्की.-कौस्तुभ परांजपे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव