Every day in jalgaon water enough for one lakh citizens gets wasted kkg | जळगावात एक लाख नागरिकांचे पाणी दररोज वाया

जळगावात एक लाख नागरिकांचे पाणी दररोज वाया

- अजय पाटील 

जळगाव : जळगाव शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळती व ‘लॉसेस’मुळे वाया जाते. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या या हजारो लिटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटरप्रमाणे ७० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहराला वाघूर धरणावरून ९६ एमएलडी पाणी दररोज दिले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाण्याचा लॉस होतो, तसेच शहराला पाणीपुरवठा होत असताना गळत्यांचे प्रमाण प्रचंड आहे. जळगावात पाणी मुबलक असले तरी वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जुनी आहे.

मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी गळत्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. परिणामी निर्धारित पाणी पोहोचत नाही.
मनपाने गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनी असल्याने गळती दुरुस्त करूनही तीच परिस्थिती आहे.

पाण्याची दरवाढ करण्यापेक्षा दररोज वाया जाणाºया पाण्याची बचत करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांना पाण्याचे मूल्य कळेल; पण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाया जाणाºया पाण्याचे मूल्य कोण करील.
- बाळकृष्ण देवरे, पर्यावरणप्रेमी

शहरातील गळत्यांवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा लॉस रोखण्यात यश आले आहे. अमृत योजनेचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यावर वाया जाणाºया पाण्यावर पूर्णपणे नियंत्रण येणार आहे.
- अरविंद भोसले, प्रभारी मुख्य अभियंता,
मनपा पाणीपुरवठा विभाग.

5,39,000 जळगाव शहराची लोकसंख्या
130 लिटर दरमाणसी पाण्याची गरज
400 पेक्षा अधिक गळत्या
70 दशलक्ष लिटर पाण्याची गरज
96 एमएलडी पाणी वाघूर धरणातून

Web Title: Every day in jalgaon water enough for one lakh citizens gets wasted kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.