एसटीचा श्रावणात शिमगा दुसरा महिना संपत आला असतानाही कर्मचाऱ्यांचे पगार होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST2021-08-19T04:20:54+5:302021-08-19T04:20:54+5:30
जळगाव : गेल्यावर्षी कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाल्यामुळे, अनेक महिने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. आता दुसऱ्या लाटेनंतर बससेवा पुन्हा ...

एसटीचा श्रावणात शिमगा दुसरा महिना संपत आला असतानाही कर्मचाऱ्यांचे पगार होईना
जळगाव : गेल्यावर्षी कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाल्यामुळे, अनेक महिने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. आता दुसऱ्या लाटेनंतर बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाली असली तरी अपेक्षित उत्पन्न येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारापुरतेही महामंडळाकडे पैसे नाहीत. त्यामुळे ऑगस्ट महिना संपण्यात येत असतानाही जुलै महिन्याचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदा मार्च ते मेपर्यंत एसटी महामंडळाची सेवा पूर्णत: बंद होती. त्यामुळे या काळात एसटी महामंडळाचे करोडो रुपयांचे उत्पन्न बुडाले. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, जूनपासून शासनाने टप्प्याटप्प्याने अनलॉक केल्यानंतर तेव्हापासून महामंडळाची सेवाही टप्प्याटप्प्याने पूर्ववत झाली आहे. राज्यासह परराज्यातही बससेवा सोडण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने अद्यापही नागरिक बाहेरगावी जाणे टाळत असल्यामुळे, महामंडळाला पूर्वीप्रमाणे अपेक्षित असलेले दैनंदिनही उत्पन्नही मिळेनासे झाले आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांचा पगारावर झाला असून, ऑगस्ट महिना संपण्यात येत असतानाही कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उसनवारीने आणि व्याजाने पैसे मागण्याची वेळ आली आहे.
इन्फो :
उसनवारी तरी किती करायची?
एसटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून पगार कमी आहेत. त्यामुळे माझ्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी घरासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी व इतर कारणासाठी बॅंकांचे, सोसायट्यांचे कर्ज काढलेले आहेत. आता दर महिन्याला पगारातून हे हप्ते कट होतात. मात्र, आता जुलै महिन्याचा पगार न झाल्यामुळे घराचा हप्ता मी मित्राकडून उसनवारीने पैसे घेऊन बॅंकेत भरला.
एसटी कर्मचारी.
मुलीच्या लग्नसाठी एका पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे. दर महिन्याला पगार झाल्यामुळे या पतसंस्थेत पैसे भरत असतो. मात्र, जुलैचा पगार न झाल्यामुळे एका नातलगाकडून पैसे घेऊन या कर्जाचा हप्ता भरला. गेल्या वर्षीदेखील अनेक महिने पगार रखडल्यामुळे खूप हाल झाले. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी काहीतरी तोडगा काढायला हवा.
एसटी कर्मचारी
इन्फो :
उत्पन्न कमी, खर्च जास्त
- कोरोनाकाळात एसटी महामंडळाची मोठ्या प्रमाणावर बससेवा बंद असल्यामुळे उत्पन्न बुडाले. त्यानंतर बससेवा नियमित सुरू होऊनही अपेक्षित प्रवासी मिळत नसल्यामुळे डिझेलचा खर्चही निघत नाही. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असा प्रकार होत आहे.
- महामंडळातर्फे अनलॉकनंतर राज्यासह परराज्यातही बससेवा नियमित सुरू केली आहे. मात्र, या मार्गांवरही मंहामंडळाला प्रवासी मिळत नसून, रिकाम्या बसेस धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर त्या दिवसाचा चालक-वाहकाचा पगार आणि डिझेलवरही खर्च होत आहे.
- तसेच शहरासह अनेक ग्रामीण भागातील रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे, परिणामी बसच्या मेंटेनन्स मोठा खर्च वाढला आहे. तसेच टायरांचा घसारा होऊन, मोेठे आर्थिक नुकसान होत आहे.
इन्फो :
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाकडे पाठपुरावा सुरूच आहे. तसेच सध्या महामंडळाची सेवा सर्व मार्गावर सुरू झाली असली तरी काही मार्गांवर प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नाही. परिणामी याचा परिणाम उत्पन्नावरही होत आहे. उत्पन्न वाढण्यासाठी महामंडळातर्फे प्रवाशांची संख्या जास्त असलेल्या मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग
इन्फो :
आकडे काय सांगतात?
आगार कर्मचारी