उगवणीच्या आधीच शेती अतिवृष्टीने गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:09+5:302021-07-02T04:13:09+5:30

भुसावळ : तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे गेल्या आठवड्यात गावाच्या उत्तर भागाला जोरदार पाऊस पडला. यात उत्तम काळे यांच्यासह ...

Even before germination the farm was carried away by heavy rains | उगवणीच्या आधीच शेती अतिवृष्टीने गेली वाहून

उगवणीच्या आधीच शेती अतिवृष्टीने गेली वाहून

भुसावळ : तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे गेल्या आठवड्यात गावाच्या उत्तर भागाला जोरदार पाऊस पडला. यात उत्तम काळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. गेल्या आठवड्यात ही परिस्थिती निर्माण झाली.

अद्याप पिके उगवलीच होती. पेरणीनंतरच हा प्रसंग ओढल्यामुळे नेमके नुकसान किती झाले, हे मात्र समजू शकत नाही.

यावर्षी भुसावळ तालुक्यात कु-हे (पानाचे) येथे पेरण्या चांगल्या प्रमाणात झाल्या होत्या. वेळेवर पाऊस पडल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले होते. पिके उगवणीला आली असतानाच कुऱ्हे पानाचे गावाच्या उत्तर भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दरम्यान, उत्तम काळे यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर तलाठी सोनवणे, कृषी सहायक पवार, माजी सरपंच रामलाल बडगुजर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, सुनील बारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

Web Title: Even before germination the farm was carried away by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.