तीन वर्षांनतरही पार्किंगचा प्रश्न सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:45+5:302021-02-05T05:59:45+5:30
जळगाव : अटीशर्तींचा भंग केल्यामुळे मक्तेदाराचा ठेका रद्द करूनही, तीन वर्षांत जळगाव आगार प्रशासनातर्फे दुचाकी पार्किंगचा प्रश्न सुटलेला ...

तीन वर्षांनतरही पार्किंगचा प्रश्न सुटेना
जळगाव : अटीशर्तींचा भंग केल्यामुळे मक्तेदाराचा ठेका रद्द करूनही, तीन वर्षांत जळगाव आगार प्रशासनातर्फे दुचाकी पार्किंगचा प्रश्न सुटलेला नाही. पार्किंगअभावी प्रवासी सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना व दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यानांही थेट स्थानकात दुचाकी पार्किंग कराव्या लागत असल्यामुळे दररोज वाहतुक कोंडी उद्भवण्याचा प्रकार घडत आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरू असते. पूर्वी या ठिकाणी प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्रपणे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिक या ठिकाणी दुचाकी पार्किंग करत असल्यामुळे, स्थानकात कुठलीही वाहतूक कोंडी उद्भवत नव्हती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून आगार प्रशासनाने अटी-शर्तींचे उल्लघंन केल्या प्रकरणी तीन वर्षांपासून संबंधित मक्तेदाराचा ठेका रद्द केल्याने, स्थानकात दुचाकी पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
इन्फो :
निविदा काढूनही प्रतिसाद मिळेना
जळगाव आगार प्रशासनातर्फे नव्याने पार्किंगचा ठेका देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, महामंडळातर्फे भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या या पार्किगचे भाडे सध्याच्या बाजारभावानुसार जास्त असल्यामुळे, या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.