जळगाव जिल्ह्यात ३६ दिवस उलटूनही ‘पणन’ च्या केंद्रावर कापसाचे एक बोंडही खरेदी नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 16:58 IST2017-12-01T16:55:06+5:302017-12-01T16:58:23+5:30
शासनाकडून जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर ३६ दिवस उलटूनही एक बोंडही कापसाची खरेदी झालेली नाही.

जळगाव जिल्ह्यात ३६ दिवस उलटूनही ‘पणन’ च्या केंद्रावर कापसाचे एक बोंडही खरेदी नाही !
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव,दि.१-शासनाकडून जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर ३६ दिवस उलटूनही एक बोंडही कापसाची खरेदी झालेली नाही. त्या उलट खासगी कापूस केंद्रावर आतापर्यंत ४ लाख गाठींची खरेदी झाली आहे. यंदा कापसाला हवा तसा भाव न मिळाल्याने शेतक-यांनी ‘पणन’च्या केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. तर ‘नाफेड’च्या केंद्रांवर कडधान्य खरेदीच्या अटी शिथिल केल्यानंतर जोरात खरेदी सुरु झाली आहे.
जिल्ह्यात यंदा साडे चार लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने ‘पणन’कडून जळगावविभागात ८ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तर सीसीआयकडून देखील १० केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र खासगी बाजारापेक्षा शासनाकडून कापसाला हमीभाव कमी व खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणीची डोकेदुखी असल्याने शेतकºयांनी पणनच्या केंद्रावर पाठ फिरविली आहे.
बोंड अळीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता
जिल्'ातील ९० टक्के कापूस क्षेत्रावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कापूस उपटून फेकत आहे. त्यामुळेही यंदा ‘पणन’च्या केंद्रावर ठणठणाटच राहण्याची शक्यता आहे. खान्देशात खासगी कापूस केंद्रावर १२ ते १३ लाख गाठींचे उदिष्ट आहे. मात्र बोंड अळीमुळे उत्पादनात घट होईल.
‘नाफेड’च्या केंद्रावर २ हजार क्विंटल उडीदची खरेदी
शहरातील बाजार समितीत सुरु असलेल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतक-यांचा ओघ वाढू लागला असून, आतापर्यंत २ हजार ३०० क्विंटल उडीदची खरेदी झाल्याची माहिती खरेदी केंद्र प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. सुरुवातीला नाफेडच्या केंद्रावर उडीद, मुग मध्ये १२ टक्के पेक्षा कमी ओलसरपणा असल्यावरच खरेदी केली जात होती. मात्र शेतकºयांनी अटी शिथिल करण्याची मागणी केल्यानंतर या ठिकाणी नाफेडच्या वतीने शेतक-यांचा माल मध्ये प्रतवारी केल्यामुळे शेतकºयांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक शेतकºयांनी उडीद विक्री केला आहे. २३६ क्विंटल मूगाची तर १७५क्विंटल सोयाबीनची खरेदी नाफेड केंद्रावर झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सुट्टी असल्यावर देखील नाफेड केंद्रावर कडधान्याची खरेदी सुरु होती.