शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

एरंडोल शहराचा पाणीप्रश्न होणार बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 12:37 IST

जानेवारीअखेर संपणार अंजनीतील साठा

ठळक मुद्दे तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्तावच नाहीच

जळगाव : यंदा अंजनी मध्यम प्रकल्पात जिवंत पाणीसाठा झालेलाच नसल्याने व मृतसाठा हा फेब्रुवारी २०१९ अखेर संपत असल्याने एरंडोल शहराचा पाणीप्रश्न बिकट होणार आहे. गिरणावरील दहिगाव व लमांजन बंधाऱ्यापासून एरंडोल नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यास मंजुरी देण्यात येणार आहे. मात्र अद्याप मजिप्राकडून याबाबतचा प्रस्तावच सादर झालेला नाही.निधीसाठी गेलाय प्रस्तावमार्च २०१९ अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांकरीता ११.८५ कोटी रूपयांचे अनुदान मिळण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. मात्र हा निधी मिळाल्यानंतर या उपाययोजनेचे काम सुरू होणार आहे. दरम्यान जिल्हाधिकाºयांनी या एरंडोल शहरासाठी तात्पुरती पाणीपुरवठा योजना घेण्यासंदर्भात सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश कार्यकारी अभियंता, महाराष्टÑ जीवन प्राधीकरण, जळगाव व मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल यांना दिले आहेत. जेणेकरून वित्तीय मर्यादेनुसार प्रस्ताव शासनाकडून मंजूर होऊन जानेवारी २०१९ अ‍ेखर योजना कार्यान्वित होऊ शकेल. मात्र जानेवारीचे दोन आठवडे संपले तरीही योजनेचा प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडेच सादर झालेला नाही.चोपड्यासाठी पाणी सोडण्यात अडचणमुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांनी चोपडा शहरासाठी गूळ धरणात राखीव पाणीसाठ्यातून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. मात्र त्याबाबत कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.१ यांना अभिप्राय मागितला असता धरणगाव नगरपालिकेसाठी स्वतंत्र पाणी सोडण्यात येणार नाही. चोपडा नगरपरिषदेसाठी पाणी सोडू तेव्हाच धरणगावसाठीही पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल, असे कळविले.तर धरणगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांनी मात्र सध्या धरणगाव शहरासाठी तापी नदी धावडा डोहातून पाणी पुरवठा होत असून सध्या हा डोह भरलेला आहे. त्यामुळे सध्या पाणी आवर्तनाची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे चोपडा नगरपालिकेला गूळ धरणातून आवर्तन सोडण्यास अडचण निर्माण झाली आहे.तर टँकरने पाणी पुरवण्याची वेळमजिप्राकडून प्रस्ताव आल्यानंतर शासनाकडून निधी मंजूर झाला की, त्यासाठी निविदा प्रक्रिया होऊन नंतर योजनेचे काम केले जाईल. ते पूर्ण होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत किमान दीड महिन्याचा कालावधी जाणार आहे. अंजनी धरणातील मृतसाठा जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारीअखेरच संपणार असला तरीही प्रशासनाच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. मात्र योजनेच्या कामास काही कारणाने विलंब झाल्यास अथवा बाष्पीभवनामुळे पाणी लवकर संपल्यास पूर्ण एरंडोल शहराला टँकरने पाणीपुरवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.