एरंडोल औदुंबर साहित्य रसिक मंचची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 16:49 IST2020-02-03T16:47:46+5:302020-02-03T16:49:03+5:30

औदुंबर साहित्य रसिक मंचची सर्वसाधारण सभा २ रोजी सर्वोदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात घेण्यात आली.

Erandol Announces Executive Director of Audumbar Literature Forum | एरंडोल औदुंबर साहित्य रसिक मंचची कार्यकारिणी जाहीर

एरंडोल औदुंबर साहित्य रसिक मंचची कार्यकारिणी जाहीर

ठळक मुद्देअध्यक्षपदी अ‍ॅड.मोहन शुक्ला यांची फेरनिवडसचिवपदी अ‍ॅड.विलास मोरे यांची निवड

एरंडोल, जि.जळगाव : येथील औदुंबर साहित्य रसिक मंचची सर्वसाधारण सभा २ रोजी सर्वोदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात घेण्यात आली. यात पुढील पाच वर्षाकरिता नूतन कार्यकारिणीची सर्वानुुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अ‍ॅड.मोहन शुक्ला यांची फेरनिवड, तर सचिवपदी अ‍ॅड.विलास मोरे, उपाध्यक्षपदी कवी प्रा.वा.ना.आंधळे व अरुण देवराम माळी यांची निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे कार्याध्यक्षपदी प्रवीण महाजन, कोषाध्यक्षपदी सय्यद जाकीर हुसेन, सहसचिवपदी किशोर पाटील, मंडळ सल्लागार पदासाठी विजय पंढरीनाथ महाजन, विजय सदाशिव जाधव, जावेद अब्दुल कादर मुजावर, अमित राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शुक्ला यांनी नियोजित राज्यस्तरीय दोन दिवसीय साहित्य संमेलन खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावे, असे आवाहन केले.

Web Title: Erandol Announces Executive Director of Audumbar Literature Forum