सहनशक्तीचा अंत.... पिंडदान करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे केले उत्तरकार्य, जेवणावळलाही उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:39 IST2020-02-06T12:38:55+5:302020-02-06T12:39:26+5:30
दुखवटा बांधून नागरिकांसह लोकप्रतिनीधींनीही क्रियेचे जेवणही घेतले

सहनशक्तीचा अंत.... पिंडदान करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे केले उत्तरकार्य, जेवणावळलाही उपस्थिती
जळगाव / नशिराबाद : महामार्गावरील खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांच्या सहन शक्तीचा अंत झाल्याने गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या विरोधात (नही) नशिराबाद येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी मुंडन करून ‘नही’चे प्रतिकात्मक दशक्रिया विधी करीत उत्तर कार्यही केले. या वेळी पिंडदानही करण्यात आले.
विशेष म्हणजे दुखवटा बांधून नागरिकांसह लोकप्रतिनीधींनीही क्रियेचे जेवणही घेतले.