गुरू-शिष्यांच्या कथ्थकाने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 09:37 PM2019-10-20T21:37:55+5:302019-10-20T21:38:44+5:30

कथ्थक प्रवाह : ८० विद्यार्थिनींचा कार्यशाळेत सहभाग

Enchanted by the story of the Guru-disciples | गुरू-शिष्यांच्या कथ्थकाने रसिक मंत्रमुग्ध

गुरू-शिष्यांच्या कथ्थकाने रसिक मंत्रमुग्ध

Next

जळगाव- प्रभाकर संगीत कला अकादमी आयोजित ‘पंचगंगा’ कथ्थक कार्यक्रमात गुरू आणि शिष्यांनी सादर केलेल्या कथ्थकाने रविवारी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते़ तसेच शिष्यांच्या कथ्थक सादरीकरणाने तर उपस्थितांनी मने जिंकून घेतली होती़
मायादेवी नगरातील रोटरी भवनात आयोजित पंचगंगा कथ्थक कार्यक्रमात मू़जे़ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी व चित्रकार संगिता राजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ कार्यक्रमात राज्यातील डॉ. अपर्णा भट-कासार, निलिमा हिरवे (पुणे), अमोल कापसे (अलीबाग), शिल्पा मुंगळे (देवरूख), रंजना फडके (मुंबई), या पाच कथ्थक गुरूंनी एकत्र येत कथ्थक प्रवाह कार्यक्रमाच्या निमित्ताने शिष्यांना कार्यशाळा व चर्चासत्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य सुरू केले असल्याची माहिती देण्यात आली़

आणि़़़रसिकांची जिंकली मने
सोलापूर, देवरूख नंतर जळगाव येथे या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प पंचगंगा कथ्थक या कार्यक्रमाच्या माध्यमातून रविवारी गुंफले गेले़ सर्वप्रथम कथ्थक गुरूंनी गुरूंनी गणेश वंदना सादर केली. नंतर ठुमरी व सर्व गुरूंनी स्वतंत्रपणे कथ्थक नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तरानावर आधारित गीत सर्व गुरूंनी आपआपल्या शिष्यांसह कथ्थक सादर करताच रसिकांची मने जिंकून घेत दाद मिळवून घेतली़

८० विद्यार्थिनींचा सहभाग
कार्यक्रमात किरण कासार, अपर्णा भट-कासार, सानिका कानगो, मृण्मयी कुलकर्णी यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन दीपिका घैसास, आकांक्षा शिरसाठे यांनी केले. आभार श्रावणी उपासनी यांनी मानले. यशस्वीतेसाठी किर्ती चौहान, साधना दामले, स्मिता पिल्ले, स्वाती पाटील, कोमल चौहान, तनया पाटील आदींसह प्रभाकर संगीत कला अकादमीच्या सर्व विद्यार्थिनी व पालकांनी परिश्रम घेतले. सकाळी झालेल्या कार्यशाळा व चर्चासत्रात ८० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सर्व गुरूंनी त्यांच्या समवेत संवाद साधत शंका निरसन करून मार्गदर्शन केले.



 

Web Title: Enchanted by the story of the Guru-disciples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.