रस्ते, वीज, गटारीच्या समस्या सोडविण्यावर भर - नूतन महापौर भारती सोनवणे यांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:10 PM2020-01-28T12:10:55+5:302020-01-28T12:11:07+5:30

माजी महापौरांचा पायंडा कायम ठेवणार ; जनतेत जावून त्यांच्या समस्या जाणून घेणार

Emphasis on solving problems of roads, electricity, gutters | रस्ते, वीज, गटारीच्या समस्या सोडविण्यावर भर - नूतन महापौर भारती सोनवणे यांचा संकल्प

रस्ते, वीज, गटारीच्या समस्या सोडविण्यावर भर - नूतन महापौर भारती सोनवणे यांचा संकल्प

googlenewsNext

जळगाव : शहरातील नागरिक गेल्या काही वर्षांपासून विविध समस्यांनी त्रस्त आहेत. भाजपची सत्ता आल्यानंतर हुडको कर्जासह विविध प्रश्न मार्गी लागले. मात्र, मुलभूत सुविधांपासून अद्याप नागरिक वंचित आहेत. महापौरपदाचा वापर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठीच करणार असून रस्ते, वीज,गटारीच्या समस्यांना प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा संकल्प नवनियुक्त महापौर भारती सोनवणे यांनी केला.
महापौरपदी निवड झाल्यानंतर भारती सोनवणे यांनी सोमवारी ‘लोकमत’ च्या शहर कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंंद कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी केले. महापौरांनी यावेळी आपल्या आगामी ध्येयधोरण व शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
जनतेसाठी पूर्ण वेळ देणार
महापौरपदाची संधी दिल्याबद्दल सोनवणे यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. शहराच्या दृष्टीने जे काही महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते ा्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेसाठी पूर्ण वेळ देवून त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला जाईल. स्वच्छतेची विस्कळलेली घडी पुन्हा बसवून स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यावर अधिक भर दिला जाईल.
प्रशासनाच्या कामात सुसूत्रता आणणार
नागरिक आपले कामे घेवून पदाधिकाऱ्यांकडे येतात. त्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या जातात, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही. त्यासाठी सर्वात आधी प्रशासनाच्या कामात सुसूत्रता आणून, नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाला अधिक गंभीरतेने वागण्याबाबत सूचन केल्या जातील. जे कर्मचारी व अधिकारी आपल्या कामात हलगर्जीपणा करतील अशा अधिकाºयांना वठणीवर आणून कामे मार्गी लावले जातील असा ही विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
महापौराच्या पदासह योग शिक्षणाचेही काम सुरु ठेवणार
नुतन महापौर या योगशिक्षीका देखील आहेत. शहरातील खान्देश मॉलमध्ये दररोज भारती सोनवणे या ३० ते ४० महिलांना योगाचे प्रशिक्षण देत असतात. आता महापौरपद मिळाल्याने त्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. मात्र, कामाचा कितीही व्याप वाढला तरी योग प्रशिक्षणाचे काम कायम राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी पदभार स्विकारणार असल्याचे त्या म्हणाल्या.
जनतेसाठी पूर्णवेळ देणार...
महापौरपदाची संधी दिल्याबद्दल भारती सोनवणे यांनी श्रेष्ठींचे आभार मानले. शहराच्या दृष्टीने जे काही प्रलंबित कामे आहेत. ते प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेसाठी पूर्णवेळ देवून त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला जाईल. यासाठी प्रत्येक दिवसाचे नियोजन केले जाईल. आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठ्याचा कामांवर अधिक भर देणार आहे. तसेच जे कर्मचारी व अधिकारी आपल्या कामात हलगर्जीपणा करतील अशा अधिकाºयांना वठणीवर आणून कामे मार्गी लावले जातील.

Web Title: Emphasis on solving problems of roads, electricity, gutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव