शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

किनोद ग्रामस्थांचा अवैध वाळू उपशाविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 12:20 IST

तापी पात्रात उतरून १२ ट्रॅक्टर अडविले

जळगाव : तालुक्यातील किनोद या गावाच्या तापी नदीपात्रात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात सोमवारी ग्रामस्थांनी एल्गार पुकारत, तब्बल १२ ट्रॅक्टर अडविले. याबाबत ग्रामस्थांनी महसूल विभागाला कळविल्यानंतर दोन तासानेही अधिकारी घटनास्थळी पोहचले नाही. त्यामुळे वाळू माफिया व ग्रामस्थांमध्ये किरकोळ वाद झाला. अखेर तीन तासानंतर तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या पथकाने घटनास्थळी जावून १२ ट्रॅक्टर जप्त केले.चोपडा तालुक्यातील सुटकार या गावाच्या तापी नदीचा तीन गटांचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, काही महिन्यांपासून वाळू माफियांकडून या अधिकृत ठेक्यावरून वाळू उपसा न करता किनोद, सावखेडा, भादली या भागातील नदीपात्रातून अवैध उपसा केला जात आहे. याबाबत या तीन्ही गावांच्या ग्रामस्थांनी महसुल विभागाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी नदीपात्रात जावून वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न केला.दशक्रिया विधीदरम्यान ग्रामस्थ आले एकत्रसोमवारी किनोद गावातील नागरिक दशक्रिया विधीसाठी नदीपात्रात गेले होते. हा विधी आटोपल्यानंतर नदी पात्रात सुमारे ५० हून अधिक ट्रॅक्टर व डंपरव्दारे वाळू उपसा होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही डंपर चालकांनी नदीपात्रातून पळ काढला. तर ग्रामस्थांनी १२ ट्रॅक्टरच्या टायरची हवा काढल्यामुळे हे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.प्रशासनाकडून हलगर्जीपणा का ?दोन आठवड्यापूर्वी आव्हाणे ग्रामस्थांनी गिरणा नदीपात्रात २० हून अधिक ट्रॅक्टर जप्त केले होते. मात्र, चार तास थांबून देखील प्रशासनाकडून दखल न घेतल्याने नाईलाजास्तव ग्रामस्थांना ही वाहने सोडून द्यावे लागली. हिच परिस्थिती किनोद येथे पहायला मिळाली. या ठिकाणीही पोहचायला प्रशासनाने तीन तास लागले. जे काम प्रशासनाने करायला पाहिजे होते. ते ग्रामस्थांकडून होत असतानाही प्रशासनाने कार्यतत्परता दाखविण्याची गरज आहे.सुस्त प्रशासन पोहचले उशीरासकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी १२ ट्रॅक्टर पकडल्यानंतर याबाबत तहसीलदार वैशाली हिंगे यांना फोनवरून माहिती दिली. मात्र, दोन तास झाल्यानंतर देखील कोणताही अधिकारी घटनास्थळी न पोहचल्याने काही वाळू माफियांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच जप्त करण्यात आलेल्या १२ ट्रॅक्टरचे मूळ मालक चोपडा, यावलहून घटनास्थळी पोहचले. पण तालुक्यातील अधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते, अशी माहिती कि नोद ग्रामस्थांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तहसीलदार वैशाली हिंगे या आपल्या पथकासमवेत घटनास्थळी पोहचल्या व त्यांनी ग्रामस्थांनी पकडलेले १२ ट्रॅक्टर जप्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव