शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीतील विद्यार्थीनीचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 19:30 IST

पष्टाने येथे मामाकडे शिक्षण घेत असलेल्या रोशनी योगेश जगताप या विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

ठळक मुद्देपष्टाने येथे हळहळ, आज दाऊळ येथे अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : तालुक्यातील पष्टाने येथे मामाकडे शिक्षण घेत असलेल्या रोशनी योगेश जगताप या विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू झाला. सर्वांशी सतत हसमुख संवाद साधणाऱ्या रोशनीच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. 

रोशनी ही पष्टाने येथे विजय शांताराम शिंपी (मामा) यांच्याकडे रहात होती. ती धरणगावी अकरावीत शिकत होती. ती घरातून ओट्यावर आली, तशी ती पायऱ्यावर बसली. थोड्यावेळातच तिची मामी, शेजारणींनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उठलीच नाही. 

रोशनीच्या आईचे माहेर पष्टाने होते. तिला शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ (मंदाणे)  येथे दिले होते. योगेश मगनशेठ शिंपी यांची ती कन्या. पंधरा वर्षांपूर्वी मुलाला जन्म देताना तिची आई मृत्यू पावली होती  तेव्हा रोशनी ३ वर्षाची होती, तेव्हापासून तिचा सांभाळ तिचा मामांनीच केला. तिला धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉ. गिरीश चौधरी यानी मृत घोषित केले. पंचनामा करून तिला तिचा गावी दाऊळ येथे नेण्यात आले आहे. तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात वडील, एक मोठी बहिण आणि एक लहान भाऊ आहे.

तीन दिवसातील दुसरी घटना

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर येथे एका तरूणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आतमा रोशनी जगताप हिचाही हृदयविकाराने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केवळ अमळनेर तालुक्यातच विशीतील तीन तरूणांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता. मंगरूळ, अमळनेर-दाजिबानगर तसेच वाघोदे येथील हे तिघे तरूण होते.

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावStudentविद्यार्थीDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटका