शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे घरातील विजेची उपकरणे जळून खाक

By admin | Updated: June 21, 2014 16:24 IST

मोहन नगरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांवर डेरेदार वृक्ष उन्मळून पडल्यामुळे दीडशे घरांमध्ये विजेचा उच्च दाब आल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली.

 

 
जळगाव : मोहन नगरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांवर (एल.टी. लाईन) डेरेदार वृक्ष उन्मळून पडल्यामुळे मोहननगरासह रवींद्र नगर, नूतन वर्षा कॉलनीतील दीडशे घरांमध्ये विजेचा उच्च दाब आल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली. त्यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
मोहन नगरात गेल्या काही दिवसांपासून गटारींचे काम सुरू आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे कारागीर खड्डे खोदत होते. त्यात मोहननगरात असलेल्या एका वडाच्या झाडाचे मूळ तोडले गेल्याने हा वृक्ष थेट विद्युत वाहिन्यांवर पडला. त्यामुळे जोरदार स्फोट झाला, अशी माहिती रतनकुमार थोरात यांनी दिली. 
स्फोट झाल्यानंतर रवींद्र नगर, नूतन वर्षा कॉलनी व मोहन नगरात विजेचा उच्च दाब येताच या परिसरातील सुमारे १५0 घरांमधील टीव्ही, फ्रिज, कुलर, इनव्हर्टर, विद्युत दिवे, पंखे, संगणक व लॅपटॉप जळून खाक झाले आहेत. 
ठेकेदार, कारागिरांचे पलायन 
गटारीचे काम सुरू असताना ठेकेदार घटनास्थळी उभा होता. मात्र, वृक्ष पडल्यामुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळण्याची घटना घडल्यानंतर संतप्त नागरिक घराबाहेर पडू लागले. हे चित्र दिसताच ठेकेदार व कारागिरांनी तेथून पलायन केले.
दुपारी ३ वाजता वॉर्डातील नगरसेवक किशोर पाटील घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी त्यांना घेराव घातला. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना ताबडतोब बोलवा..झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे..अशी मागणी त्यांच्याकडे केली. पाटील यांनी स्थानिक नागरिकांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 
जबाबदारी कोणाची?
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी क्रॉम्प्टन कंपनीशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कर्मचारी घटनास्थळी आले. ठेकेदाराची चूक असल्याचे सांगून 'काडीने औषध लावल्यासारखा' प्रकार करून निघून गेले. यानंतर काही नागरिकांनी मनपा आयुक्त कापडणीस यांच्याशी संपर्क साधला. 
मात्र, त्यांनीही महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याचे सांगून घटनास्थळी येण्याचे टाळले. त्यामुळे जबाबदारी कुणाची? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. नगरसेवक किशोर पाटील यांनी वृक्ष उचलण्यासाठी ट्रॅक्टर बोलावूनदेखील 'आयुक्त आल्याशिवाय वृक्ष उचलू देणार नाही' अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतल्यामुळे परिसरात बराच वेळ गोंधळ सुरू होता. या घटनेमुळे या भागातील विज पुरवठा बराच वेळ खंडित होता. 
क्रॉम्प्टन कंपनीचे शहर प्रमुख मुकेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की एलटी लाईनवर वृक्ष पडल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली. माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कंपनीने ज्या घरातील वीज मीटर जळून खाक झाले ते बदलवून देण्याची तयारी दर्शविली. मात्र, स्थानिक नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची भरपाई कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे कंपनीच्या कर्मचार्‍यांना परत जावे लागले. दरम्यान, येथील विद्युत वाहिन्यांवर वृक्ष सायंकाळपर्यंत पडून असल्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता.