वयोवृद्ध महिलेला घरात जावून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:48 IST2020-05-30T22:48:18+5:302020-05-30T22:48:29+5:30

दोघांच्याविरुद्ध तक्रार

Elderly woman threatened to go home and beat him to death | वयोवृद्ध महिलेला घरात जावून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी

वयोवृद्ध महिलेला घरात जावून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी


चाळीसगाव-तालुक्यातील सांगवी येथील ताईबाई ताराचंद चव्हाण या ८५ वर्षीय महिलेला धर्मराज पोमा चव्हाण व रोहिदास पोमा चव्हाण (दोघे रा.सांगवी )या दोघांनी विनाकारण अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, २७ रोजी दुपारी साडेचार वाजता तक्रारदार महिला ही घरी चहा करीत असतांना अचानकपणे धर्मराज चव्हाण व रोहिदास चव्हाण या दोघांनी काठ्या घेऊन मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आले.त्यानंतर त्यांनी अश्लील शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या जागेवरून आठ दिवसापूर्वी तुला व तुुुझ्या मुलीला आम्ही मारहाण करून हाकलून लावले होते.त्यानंतर ही परत या जागेवर आली कशी ? अशी विचारणा करत मारहाण करीत हाकलून दिले.

Web Title: Elderly woman threatened to go home and beat him to death