शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

रावेर तालुक्यातील नेहता येथे वृद्ध शेतकऱ्याने पत्नीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:05 AM

किरण चौधरी रावेर : तालुक्यातील नेहता येथील फकीरा तुकाराम वैदकर (वय ७३) या वृध्दाने पहाटे पती पत्नीत काही वाद ...

ठळक मुद्देवृद्धेला झटापटीत शेगडीचेही दिले चटकेसोमवारी पहाटे काढा बनवताना घडली घटना

किरण चौधरीरावेर : तालुक्यातील नेहता येथील फकीरा तुकाराम वैदकर (वय ७३) या वृध्दाने पहाटे पती पत्नीत काही वाद झाल्याने संतापाच्या भरात पत्नी कमलाबाई (वय ६६) ह्या विद्युत शेगडीवर काढा बनवत असतांना तिच्या जबड्यावर व गळ्यावर तीक्ष्ण बख्खीच्या साह्याने वार केले. रक्ताचे थारोळ्यात कमलबाई या वीज पुरवठा सुरू असलेल्या शेगडीवर पडल्याने हात पाय झटकत असताना त्यांना हाताच्या कोपर्‍यावर, छातीवर व मांडीवर वायर व तप्त कॉईलचे चटके लागून त्या जागीच ठार झाल्या, तर वृध्दाने ती खोली बाहेरून बंद करून शेजारच्या खोलीत जावून आतून दरवाजा बंद करून कडीला दोरीच्या साहाय्याने स्वत: आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. नात कु हर्षाली ही दुध देण्यासाठी आली असता सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन सोनवणे, पो ना नंदकिशोर महाजन,महेंद्र सुरवाडे, पो कॉ भरत सोपे, पो कॉ सुरेश मेढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्र फिरवली आहेत.    वृद्ध हे पत्नीशी नेहमीच स्वयंपाकावरून वा या ना त्या कारणाने हुज्जत घालून संतापात बख्खीने छाटून टाकण्याची धमकी देत होते. अखेर त्या संतापाचे पर्यावसान आज पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या करण्यात झाले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे यांनी घटनास्थळी इन्क्वेस्ट पंचनामा करून त्यांचे दोन्ही मुले रवींद्र व गणेश वैदकर यांच्या जाबजबाबातून फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे. यावेळी सरपंच महेंद्र पाटील व पोलीस पाटील सरला शितल कचरे या उपस्थित होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर