यावलमध्ये विहिरीत ज्येष्ठ दाम्पत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 13:25 IST2020-06-17T13:21:39+5:302020-06-17T13:25:31+5:30
एका ज्येष्ठ दाम्पत्याने विहिरीत आत्महत्या केली.

यावलमध्ये विहिरीत ज्येष्ठ दाम्पत्याची आत्महत्या
यावल : येथील ज्येष्ठ दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. भागवत उर्फ बाळू डीगंबर पाटील (माळी) (वय ६१) व पत्नी विमलबाई (वय ५७) रा. संभाजी पेठ, यावल अशी त्यांची नावे आहेत.
शहरातील फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयासमोरील निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीत ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. ते भुसार मालाचे व्यापारी होते. त्यांच्या मागे दोन विवाहीत मुली आहेत.
शहरातील प्रसिद्ध धान्य व्यापारी तथा माजी नगरसेवक व बाजार समीतीचे संचालक पुंजो डीगंबर पाटील यांचे ते लहान बंधू होत. बुधवारी सकाळी घटनेचे वृत्त कळताच फैजपूर रस्त्यावरील घटनास्थळी यात्रेचे स्वरूप आले होते.
घटनास्थळी पो. नि. अरूण धनवडे, पोउनि विनोद खांडबहाळे व सहकारी पोहचले. मृतदेहाना काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.