शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

एकनाथ खडसे लवकरच भाजपातून बाहेर पडणार, शिवसेना नेते संजय राऊत यांचे जळगावात वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 19:33 IST

पत्रपरिषद

ठळक मुद्देविधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी राहुल गांधी भविष्यातील देशाचे नेते 

ऑनलाईन लोकमत

जळगाव -  माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपात फार काळ राहणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केले. शहरातील अजिंठा विश्रामगृहात गुरुवारी सायंकाळी ही पत्रपरिषद झाली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील,  जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार, किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार आर. ओ. पाटील व चिमणराव पाटील यांची मुख्य उपस्थिती होती. खडसे यांचा विषय त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने संपला असल्याचे मतही जिल्हा  दौ-यात राऊत यांनी व्यक्त केले. या विषयाचा धागा पकडत पत्रपरिषदेत विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, खडसे हे भाजपातून बाहेर पडणार हे निश्चित आहे मात्र ते  कोणत्या पक्षात जातील हे सांगता येत नाही. सध्या ते अजित पवार यांच्या कानात जास्त बोलू लागले आहेत आणि पवारही त्यांना टाळ्या देवू लागले आहे, असे सूचक  वक्तव्यही त्यांनी केले. खडसे यांच्या बद्दल सेनेला सहानुभूती खडसे हे शिवसेनेत येण्यास तयार असले तर पक्षाची काय भूमिका राहील ? या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, शिवसेना आणि भाजपा युती ही खडसेंच्या तोंडूनच तुटली. युती तुटल्याचा त्यांना आनंदच झाला. मात्र शिवसेना संपविण्याचा ज्यांनी ज्यांनी र्पयत केला ते स्वत: च संपले हा आजर्पयतचा इतिहास आहे. तरीदेखील आम्हाला त्यांच्या बद्दल सहानुभूती आहे. ते शिवसेनेत येण्यास उत्सुक असल्यास पक्षप्रमुखांशी चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी भविष्यातील देशाचे नेते गुजरात निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची नेतृत्व क्षमता चांगली दिसून आली. ते भविष्यातील देशाचे नेते आहेत. गुजरातमध्ये भाजपाचा विजय हा अपमानास्पद विजय आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 सभा या निवडणुकीत घेतल्या. सर्व प्रकारची शक्ती लावली तरीही काठावर विजय मिळाला. यामुळे ही एक प्रकारे भाजपाची हारच आहे. अहंकारी पक्षांसाठी गुजरातची निवडणूक ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले. 

विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. भाजपाचे मंत्री गिरीष बापट यांनीही याबाबत नुकतेच वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मनातच काही तरी चालले आहे, हे दिसून येते. निवडणुका केव्हाही लागल्या तरी आम्ही तयार आहोत, असे सांगताना आगामी निवडणुकीत युती होईल का? या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेSanjay Rautसंजय राऊतJalgaonजळगावBJPभाजपाShiv Senaशिवसेना