Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहलं तातडीने पत्र; पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 14:43 IST2023-05-18T14:36:50+5:302023-05-18T14:43:34+5:30
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना एका महत्वपूर्ण विषयावर पत्र लिहिले आहे.

Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहलं तातडीने पत्र; पण का?
प्रशांत भदाणे
राज्यात सध्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाला दिलासा मिळालाय. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने पत्र लिहलंय. या पत्रात खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना एका महत्वपूर्ण विषयावर पत्र लिहिले आहे. जळगावसह संपूर्ण राज्यभरात सध्या उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती समजून उष्माघाताने मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने पाच लाखांची शासकीय मदत करण्याचं आवाहन खडसेंनी मुख्यमंत्र्यांना केलंय. खडसेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर शासन काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खडसेंनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.