शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

Eknath Khadse: समजा विरोधकांनी हे सरकार पाडलंच, तरी...; एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 09:20 IST

चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले असून सत्तेत नसल्याने त्यांना वन वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच, अशा प्रकारचे वक्तव्य ते करतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

जळगाव/भुसावळ - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचे विधान करतात. मात्र, २ वर्षांपासून हे सरकार स्थीर असल्याचे दिसून येते. नुकतेच, १० मार्च रोजी देशातील पाच राज्यांच्या निवडणुक निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत भविष्यवाणी केली होती. त्यावरुन, राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंनीही पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. 

भुसावळ येथे अनिकेत पाटील मित्रमंडळ व अफ्फन क्रिकेट क्लबतर्फे आयोजीत स्व. निखीलभाऊ खडसे स्मृती चषक-२०२२ या स्पर्धेच्या पारितोषीक वितरणाच्या कार्यक्रमात आल्यानंतर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री श्रावणी गोस्वामी, खासदार रक्षा खडसे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे, आधी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार १० माचर्नंतर जाणार असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या मुद्द्यामवर माध्यमांनी उपमुख्यमंत्री पवार यांनी छेडले असता. त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. तर, एकनाथ खडसेंनी पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी अनेकवेळी त्यांनी तारखा जाहीर केल्या. मात्र, चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले असून सत्तेत नसल्याने त्यांना वन वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच, अशा प्रकारचे वक्तव्य ते करतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. बहुमताच्या जोरावर हेच सरकार येणार

बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहे. सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे. सरकार पाडायला ठोस कारण असलं पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोपर्यंत हे सरकार कुणीही पाडू शकत नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली. 

अण्णा हजारेंचा विरोध

वाईनबाबत एक विरोध करतोय तर दुसरे स्वागत करत आहेत. वाईन ही दारू असल्यानेच अण्णा हजारेंनी विरोध केला आहे. मध्यप्रदेशात मॉलमध्ये बिअर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्र प्रदेशमध्ये भाजपला निवडून दिलं तर दारुही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य येथील प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का? असा सवालही एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

बच्चू कडूंच्या राजीनाम्याबाबतही बोलले

मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी बच्चू कडू हे वरच्या न्यायालयात दाद मागणार असून वरच्या न्यायालयात काय निर्णय लागतो याची वाट पाहिली पाहिजे, असे म्हणत खडसेंनी कडूंची पाठराखण केली.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसeknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी