एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 16:38 IST2019-05-09T16:38:00+5:302019-05-09T16:38:27+5:30

पारोळा तालुक्यातील ढोली ढाब्यावरील घटना

Ekas breathe heavily | एकास बेदम मारहाण

एकास बेदम मारहाण


पारोळा : ढोली ता. पारोळा येथील हॉटेल बापूजी ढाब्यावर ५ रोजी एकास बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती अशी की, फिर्यादी कौतिक भावसिंग राजपूत रा. बाबरे ता. जि. धुळे हे व सोबत भूषण रघुनाथ राजपूत रा. बाबरे व बबलू जाधव हे तिन्ही जण जेवणास बसले असता जुन्या भांडणावरून वाद झाला.
यात भूषण याने कपाळावर काही तरी वस्तू मारून फेकली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. बबलू याने छाती पोटावर मारहाण करून शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
यावरुन कौतिक राजपूत यांच्या फिर्यादी वरून या दोन्ही जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल हेमंत देवरे व सहकारी करीत आहेत.

Web Title: Ekas breathe heavily