नशिराबादला अठरा विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST2021-01-02T04:14:13+5:302021-01-02T04:14:13+5:30

(०२सीटीआर १९) नशिराबाद : सर्वोदय माध्यमिक विद्यालयातील १८ अनाथ मुले व मुली यांना प्रहार जनशक्ती पक्षाने दत्तक घेऊन त्यांच्यावर ...

Eighteen students were adopted in Nasirabad | नशिराबादला अठरा विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

नशिराबादला अठरा विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

(०२सीटीआर १९)

नशिराबाद : सर्वोदय माध्यमिक विद्यालयातील १८ अनाथ मुले व मुली यांना प्रहार जनशक्ती पक्षाने दत्तक घेऊन त्यांच्यावर वर्षभरातील होणारा शैक्षणिक खर्च करण्याचा संकल्प केला आहे.

विद्यार्थ्यांची नावे- लीना बोंडे, खुशी माळी, चैताली माळी, धनश्री कुंभार, जयेश माळी, हर्षाली सोनवणे, आरती भोई, तुषार ठाकरे, गायत्री सोनवणे, नम्रता महाजन, विशाल भिल, दीपाली भोई, भावेश पाटील, रिंकू माळी, सुनील महाजन, सुनीता बिराडे, वैशाली बिराडे, दामिनी मिस्तरी या विद्यार्थ्यांना प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष मोहन माळी यांच्याकडून वार्षिक शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात उपस्थित सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दिलीप चौधरी व इतर शिक्षक, अधिकारी, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष मोहन माळी, शहर उपाध्यक्ष संदीप माळी, सचिव गोपाल पाटील, निसार शेख कार्यक्रमाला उपस्थित होते.

Web Title: Eighteen students were adopted in Nasirabad