आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:32 IST2019-07-23T12:31:56+5:302019-07-23T12:32:23+5:30
जामनेर तालुक्यातील वाकी येथील घटना

आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा नदीत बुडून मृत्यू
जामनेर, जि. जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकी येथे नदीवर आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाण्याच बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मयंक संतोष बºहाटे हा आठ वर्षीय बालक त्याच्या आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी नदीवर गेला होता. त्या वेळी तो पाण्यात उतरला आणि खाली बुडाला. नातेवाईकांनी त्यास जामनेर येथे उप जिल्हा रुग्णालयात हलविले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.