शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

बोदवड स्टेट बँकेतून साडेआठ लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 5:54 PM

स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या इसमाजवळून आठ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ रोजी सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी घडली.

बोदवड : शहरातील स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या इसमाजवळून आठ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ रोजी सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी घडली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.शहरातील अमर डेअरीच्या मालकीची रक्कम भरणा करण्यासाठी डेअरीचा वाहनचालक असलेला कर्मचारी उमेश रमेश महाजन हा नऊ लाख रुपये घेऊन स्टेट बँकेत आला. एका बॅगेत ६० हजार रुपये रक्कम मोजून देत असताना दुसरी बॅग ज्यात आठ लाख ४० हजार रुपये रोख होते. ती जवळच्या टेबलावर ठेवली. तेव्हा काही कळायच्या आत मागून आलेल्या अज्ञात इसमाने आठ लाख ४० हजार रुपये रोख असलेली बॅग अलगद उचलून नेली हा प्रकार अगदी एका मिनिटात घडला. त्यानंतर पैशांच्या बॅगचा शोधाशोध केली असता चोरटा पसार झालेला होता.ही बॅग चोरत असताना निळ्या रंगाचा शर्ट घातलेला २० ते २२ वर्षांचा तरुण बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याला या कामी मदत करणारा पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला तरुणही दिसतो.याबाबतची फिर्याद उमेश महाजन याने बोदवड पोलिसात दिली आहे.दरम्यान, गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात याच बँकेत अशाच प्रकारे जिल्हा परिषद सदस्य अनिल खंडेलवाल यांची पेट्रोलपंपाची ७० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी लांबविली होती. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी बँकांना सुरक्षा रक्षक नेमण्याचे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे सूचविले होते. परंतु आधीच्या घटनेतून बोध न घेतल्याचे आजच्या घटनेतून दिसून येते, असा आरोप जनसामान्यांतून होत आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी पाहणी करत काही पुरावे घेतले असून तपास सुरू केला आहे, तर बँकांनी सुरक्षा रक्षक नेमावे तसेच सीसीस्टीव्हीदेखील सुरू ठेवावे असे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBodwadबोदवड