शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

साडेआठवर्षीय बालकाला जीबीएसचा आजार, अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 19:06 IST

दूषित पाणी, अन्नामुळे पसरतो आजार

जयदेव वानखडेजळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम खेर्डा बुद्रूक येथील एका साडेआठ वर्षीय बालकाला जीबीएस नावाचा आजार असल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये आढळून आले आहे. या बालकावर सध्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रमध्ये जीबीएस नावाच्या आजाराने सध्या भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यातच खेर्ड्यासारख्या कमी लोकवस्तीच्या गावामध्ये म्हणजे ग्रामीण भागातही आता जीबीएसचा रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर, जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बालकाला पंधरा दिवसांपूर्वीच हातापायात अशक्तपणाचा त्रास सुरू होता.

त्यांनी स्थानिक ठिकाणी उपचार घेतले व त्यानंतर जळगाव जामोद, खामगाव येथील उपचारानंतर त्यांनी अकोला येथे खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्या ठिकाणीच संबंधित बालकाला वैद्यकीय तपासणी आणि रक्त तपासणी मध्ये १३ फेब्रुवारी रोजी जीबीएस नावाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. अशा आजारावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार करणे अतिशय महागड्या स्वरूपाचे असल्याने त्यांनी तत्काळ अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या बालकाला दाखल केले.

शासकीय योजनेतून उपचारशासकीय योजनेतून बालकावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. या आजारामध्ये हात पायामध्ये कमजोरी येऊन चालणे, बसणे अवघड होऊन जाते. तसेच मेंदूपासून हातापायापर्यंत येणाऱ्या नसांची हालचाल ही कमी होते. त्यामुळे हाता पायामध्ये कमजोरी येते. हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. म्हणजेच या आजारामध्ये स्वतःची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच मज्जातंतूंवर हल्ला करते.दूषित पाणी, अन्नामुळे पसरतो आजारहा आजार दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे पसरतो, असे डॉक्टरांचे मत आहे. या बालकाची प्रकृती सध्या बरी असून पूर्वीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के सुधारणा असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. रुग्ण आढळण्यापूर्वी गावातीलच आणखी एका छोट्या बालकाला हीच लक्षणे होती. परंतु, उपचाराने तो बालक बरा झाला.

टॅग्स :JalgaonजळगावHealthआरोग्य