शून्य टक्के व्याजाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:27+5:302021-06-16T04:23:27+5:30

भुसावळ : विद्यार्थी व पालकांकडून शैक्षणिक संस्थांनी अतिरिक्त शुल्क वसूल करू नये. विद्यार्थी ज्या सेवांचा वापर करत नाहीत ...

Educational loans should be given to students at zero percent interest | शून्य टक्के व्याजाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जावे

शून्य टक्के व्याजाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जावे

भुसावळ : विद्यार्थी व पालकांकडून शैक्षणिक संस्थांनी अतिरिक्त शुल्क वसूल करू नये. विद्यार्थी ज्या सेवांचा वापर करत नाहीत त्या सेवांसाठी शुल्क आकारणी थांबवावी. शिक्षण शुल्क समितीने नव्याने शिक्षण शुल्क निश्चित करावे. बँकांनी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज लागू करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष नीलेश कोलते यांनी केली आहे. याविषयी संबंधित मंत्री व विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती कोलते यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी विद्यार्थी वापरात नसलेल्या सुविधांचे शुल्क कमी करावे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचा मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी. केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना लागू करण्याचे निर्देश द्यावे. शासनाने याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

Web Title: Educational loans should be given to students at zero percent interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.