शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा येथे ललित कला केंद्रातर्फे ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती’ कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 23:39 IST

ललित कला केंद्रात विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती व उपयोग’ याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.

चोपडा, जि.जळगाव : भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्रात ए.टी.डी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, फौंडेशन तसेच जी.डी. आर्टच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती व उपयोग’ याविषयी १० रोजी कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत कटपुतली बाहुलीकार आंतरराष्ट्रीय पातळीवरील सतत तीन वेळेस निवड झालेले व पारंपरिक बाहुली कठपुतळीसाठीचे एकमेव विजेता ठरलेले चोपडा येथील प्रा.दिनेश मधुकर साळुंखे हे मार्गदर्शक म्हणून होते. सतत ध्यास आणि गुरूंचे मार्गदर्शन त्यामुळे आपल्याला वाटेल ती उंची गाठता येते. पतपेढीपेक्षा आपण बँक होणेच पसंत करावे. म्हणजे आपल्या ज्ञानाचा भरपूर प्रमाणात प्रसार करता येतो. तसेच शैक्षणिक साहित्य याविषयी निर्मिती आणि त्यांचे विविध प्रकारे उपयोग यावर हसत-खेळत माहिती दिली. अतिशय अल्प खर्चात आणि सोप्या पद्धतीत आपण शैक्षणिक साहित्य कसे निर्माण करू शकतो याचे प्रात्यक्षिकही दिले. यामध्ये क्षणचित्रे घडी चित्रे, चलचित्रे, मॅजिक फोल्डर, मॅजिक बॉक्स कल्प फलक, संच त्रिमिती चित्र, डायमंड शेप इत्यादी असे अनेक साहित्य कौशल्यपूर्वक निर्मितीवर प्रकाश टाकला. तसेच प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांकडून आकृतीसह नमुनेदेखील करून घेतले आणि या शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात वेळेची बचत करमणूक तसेच स्मरण शक्तीत चालना देणे आणि विद्यार्थ्यांना कसे खेळवून ठेवता येते हे स्पष्ट केले. या साहित्य निर्मितीद्वारा रोजगारही मिळू शकतो याची जाणीव करून दिली.या उपक्रमप्रसंगी प्रा.संजय नेवे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ प्राध्यापक जी.व्ही. साळी यांनी प्रा.दिनेश साळुंखे यांचे स्वागत केले. प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. उपक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सुनील बारी, प्रा.विनोद पाटील तसेच भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :artकलाChopdaचोपडा