शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘अभ्यास जत्रे’तून शैक्षणिक गुणवत्तेसह वाढतेय संवाद कला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 10:39 IST

जळगावातील स्तूत्य उपक्रम : सात वर्षांपासून के.सी. ई सोसायटीमध्ये यशस्वी प्रयोग

-विजयकुमार सैतवालजळगाव : इंग्रजी माध्यम असो की मराठी माध्यम, आज कोणत्याही शाळेत शैक्षणिक गुणवत्तेवर भर दिला जातो. मात्र जळगावातील खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या (के.सी.ई.) पूर्व प्राथमिक वर्गापासूनच शैक्षणिक गुणवत्तेसह संवाद कला वाढण्यावरही भर दिला जात आहे. यासाठी गेल्या सात वर्षांपासून या शाळांमध्ये ‘अभ्यास जत्रा’ हा अनोखा उपक्रम राबवला जात असून त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य व आत्मविश्वास वाढीस लागत आहे.

आज स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यास चांगल्यात चांगले शिक्षण मिळावे म्हणून पालक धडपड करीत असतात. त्यादृष्टीने अनेक नवनवीन शाळाही उदयास येत आहे. त्या ठिकाणी चांगले शिक्षण मिळतही आहे. मात्र जळगावातील खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या (के.सी.ई.) शाळांमध्ये मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह संवाद कौशल्यावरही भर दिला जात आहे. यासाठी संस्थेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी पुढाकार घेत संस्थेच्या किलबिल बालक मंदिर या पूर्व प्राथमिक व गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील या प्राथमिक शाळांध्ये ‘अभ्यास जत्रा’ हा शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे.

अभ्यास जत्रा म्हणजे विद्यार्थ्यांनी आपण शिकत असलेला व परीक्षेत असणारा विषय शैक्षणिक साहित्याद्वारे इतरांना समजावून देण्याचा केलेला प्रयत्न होय. या अभ्यास जत्रेत सर्व विषयांवरील शैक्षणिक साधने शिक्षकांनी अथवा विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने तयार केलेली असतात. या साधनांच्या आधारे विद्यार्थी त्या त्या विषयांची माहिती तोंडपाठ सांगतात. वर्गातही शैक्षणिक साहित्याद्वारे शिकविले गेल्याने विद्यार्थी त्या त्या विषयात पारंगत होतात. यामुळे परीक्षेत त्यांना उत्तरे लिहिणेदेखील सोपे जाते.

गेल्या सात वर्षाचा अनुभव पाहता विद्यार्थ्यांची मौखिक उजळणी होण्यासह मुले चांगल्या प्रकारे संवाद साधू लागले आहेत. निर्भिडपणा आल्याने त्यांच्यात संभाषण कौशल्यही वाढीस लागत आहे. सोबतच भाषेचाही विकास होऊन प्रश्नोत्तराचा उत्तम सराव होत असल्याचा सुखद अनुभव येत आहे, असे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिकTeacherशिक्षक